Manasvi Choudhary
आजकाल बाजारात अनेक मंंगळसूत्राच्या डिझाईन्स ट्रेडिंगमध्ये आहेत. मंगळसूत्र आणि त्याला मॅचिंग असणारे कानातले याला अधिक पंसती मिळत आहे.
5 मंगळसूत्र व कानातले पॅटर्न्स कोणते आहेत ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
अत्यंत बारीक आणि नाजूक डिझाईनचे डायमंड पेंडंट असलेले मंगळसूत्र आणि त्याला शोभून दिसणारे छोटे स्टड्सहे वर्किंग वुमनसाठी बेस्ट आहे.
लहान फुलांच्या आकाराचे आकर्षक पेंडंट आणि कानात डिझायनर झुमकी किंवा छोटे फुल पॅटर्न सध्या ट्रेंडमध्ये आहे.
पानांच्या आकाराची नक्षी हे आजकालच्या दागिन्यांमधील नवीन ट्रेंड आहे. या मंगळसूत्रासोबत मिळणारे मॅचिंग पानांच्या डिझाईनचे इयरिंग्स तुमचा लूक खुलवतील.
तुम्हाला युनिक आणि वेस्टर्न लूक हवा असेल, हटके आणि स्टायलिश मंगळसूत्र आणि ट्रेंडी ड्रॉप इयरिंग्सचा सेट नक्की ट्राय करा.
सणासुदीला किंवा पारंपारिक कार्यक्रमांसाठी कुंदन वर्क केलेले मंगळसूत्र आणि मॅचिंग कानातले अतिशय रॉयल लूक देतात.