रात्री उशिरा चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

Manasvi Choudhary

रात्री चहा पिणे फायदेशीर की घातक?

रात्री जेवण झाल्यानंतर गरमागरम चहा पिण्याची सवय अनेकांना असते. रात्री चहा प्यायल्याने दिवसभराचा सर्व थकवा दूर होतो असे अनेकांना वाटते. पण खरोखरच रात्री उशिरा चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर असते की घातक? हे जाणून घ्या.

Is Drinking Tea at Night Good or Bad for Health

झोप येत नाही

चहामध्ये कॅफिन असते जे मेंदूला उत्तेजित करते. रात्री उशिरा चहा प्यायल्यामुळे झोपेत अडथळा निर्माण होतो.

Insomnia / Sleep Disturbance | pinterest

तीव्र ॲसिडिटी आणि छातीत जळजळ

रात्री चहा प्यायल्याने गॅस्ट्रिक ॲसिडचे प्रमाण वेगाने वाढते, ज्यामुळे छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर येणे आणि पोट फुगणे त्रास होतो.

Acidity & Heartburn | saam tv

पचनसंस्थेवर परिणाम

रात्री झोपण्यापूर्वी चहा प्यायल्याने अन्न पचवण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. पचनसंस्थेवर परिणाम होतो.

Poor Digestion

वारंवार लघवीची समस्या

चहामध्ये डाययूरेटिक गुणधर्म असतात, ज्यामुळे मूत्रपिंडावर ताण येतो आणि रात्रीच्या वेळी वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होते.

urine | pinterest

उच्च रक्तदाब आणि हृदयाचे आरोग्य

कॅफिनमुळे हृदयाचे ठोके जलद होतात आणि रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. ज्या लोकांना आधीच हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांच्यासाठी रात्रीचा चहा अत्यंत धोकादायक ठरू शकतो.

High Blood Pressure | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam Tv

NEXT: Bank Account Money After Death: खातेदाराच्या मृत्यूनंतर बँक खात्यातील पैशांचे काय होते? जाणून घ्या नियम

Bank Account Money After Death
येथे क्लिक करा..