Home Price Saam Tv
बिझनेस

Home Price Hike: मुंबई-पुण्यात घराचं स्वप्न महागणार! सर्वसामान्यांच्या खिशाला झळ, घराची किंमत का वाढतेय?

Home Price Increase: भारतात घरांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. चीन, अमेरिका आणि युरोपमधून येणाऱ्या बांधकाम साहित्यावरील आयात शुल्क वाढला तर घरांच्या किंमती महागणार आहेत.

Siddhi Hande

देशात घराच्या किंमती महागणार

चीन, अमेरिका आणि युरोपमधून येणाऱ्या आयात शुल्कात वाढ होण्याची शक्यता

घराच्या किंमती ५ लाखांनी वाढण्याची शक्यता

प्रत्येकाचे स्वतः चे हक्काचे घर असावे, असं सर्वांचेच स्वप्न असते. घर घेण्यासाठी प्रत्येकजण थोडे-थोडे पैसे जमवतात. स्वतः चं हक्काचं घर ही भावनाच खूप वेगळी असते. परंतु आता घरांच्या किंमती महागणार आहे. सर्वसामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न महागणार असल्याची शक्यता आहे.

चीन, अमेरिका आणि युरोपमधून बांधकाम साहित्य भारतात येते. या बांधकाम साहित्यावर ५० टक्के आयात शुल्क लावण्याची शक्यता आहे. जर हे आयात शुल्क लावले तर त्याचा थेट परिणाम घरांच्या किंमतीवर होणार आहे.घरांच्या किंमती महागणार आहेत. अॅनारॉकच्या अहवालानुसार, असे झाले तर भारतात घरबांधणीचा खर्च हा ५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त वाढू शकतो. घर बांधणारे बिल्डर्स हा खर्च ग्राहकांवर टाकतात.

जर बांधकामावरील खर्च वाढला तर मुंबई पुण्यातील घराच्या किंमतीत ४०० ते ५०० रुपये प्रति चौरस फूट वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किंमती ५ लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. याचा फटका थेट सर्वसामान्यांमा बसणार आहे.

सध्या छोट्या विकासकांनी कमी नफा होत असल्याने नवे प्रकल्प कमी केले, सुविधा कमी केल्या. अनेक प्रकल्पदेखील पुढे ढकलले आहे.यामुळे हाउसिंग सेक्टर आधीच अडचणीत आहे.

घरांच्या किंमती वाढण्यामागची कारणे

२००९ पासून घरबांधणीच्या खर्चात जवळपास ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

खर्चातील ही वाढ सिमेंट, स्टील, अॅल्युमिनियम, तांबे, मजुरी यामुळे झाली आहे.

मजुरीच्या खर्चात २०२४ मध्ये २५ टक्क्यांनी वाढ झाली असून याचा परिणाम थेट बांधकाम खर्चावर होत आहे. २०१९ पासून मजुरीत १५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आता आयात शुल्क वाढल्यावर हा नवीन अतिरिक्त भारदेखील जोडला जाईल.

परदेशातून येणाऱ्या फिनिशिंग मटेरियल, फिटिंग्स, उपकरणे आयात करण्यावर टॅरिफचा परिणाम होईल. त्यामुळे घरांच्या किंमती वाढतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrapur: शासकीय इमारतीत रंगली दारू पार्टी, जिल्हा परिषद अभियंत्यांचा प्रताप; पाहा VIDEO

Vomiting In Bus: बसमधून प्रवास करताना उलट्या का होतात?

Horrific Accident : विमानतळ रोडजवळ भीषण अपघात, भरधाव ट्रकने डझनभर लोकांना चिरडलं, दोघांचा मृत्यू

Mumbai Monorail: मुंबईच्या मोनोरेलचा पुन्हा खुळखुळा; पावसात सेवा ठप्प, प्रवाशांचा जीव धोक्यात

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT