Ranbir Alia: २५० कोटी खर्च करुन बांधलं आलिया-रणबीरच्या स्वप्नातील घर; फोटो पाहून चाहते थक्क
Ranbir Alia New House: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे स्वप्नातील घर आता तयार झाले आहे. सुमारे २५० कोटी रुपयांचा हा बंगला कृष्णा राज कपूर यांच्या नावावर आहे. रणबीरच्या आजी-आजोबांचे हे घर आता रिया कपूरला भेट आहे. रणबीर आणि आलिया लवकरच या नवीन घरात शिफ्ट होऊ शकतात. बंगल्याची अनेक झलक व्हायरल झाल्या असून एक नवीन व्हिडिओ आता समोर आला आहे.
नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये या बंगल्याचा समोरचा भाग, गॅलरी, सुंदर बाग, मोठे झूमर आणि आलिशान सोफ्यांचा नजारा पाहायला मिळाला. पांढऱ्या आणि ग्रे रंगछटेतील या घराचा डिझाइन आधुनिक असून त्यात एक वेगळीच शोभा दिसते.
हा बंगला सहा मजली असून, आलिशान इंटिरियर आणि भव्य जागेमुळे तो सध्या बॉलिवूडमधील सर्वात महागडा बंगला ठरला आहे. शाहरुख खानचा मन्नत (सुमारे २०० कोटी) आणि अमिताभ बच्चनचा ‘जलसा’ (सुमारे १०० कोटी) या दोन्ही घरे या बंगल्यापेक्षा कमी किमतीची आहेत. त्यामुळे रणबीर-आलियाचे हे घर बॉलिवूडमधील सर्वात महागडे घर आहे.
आजी कृष्णा राज कपूर यांच्या नावावर बंगला
रणबीर आणि आलियाचा आलिशान बंगला, रणबीरची आजी कृष्णा राज कपूर यांच्या नावावर आहे. विशेष म्हणजे या बंगल्याचा गृहप्रवेश दिवाळीत होणार असल्याची चर्चा आहे. आलिया-रणबीर आपल्या मुली राहासोबत या नव्या घरात पहिली दिवाळी साजरी करणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.