Mumbai-Hyderabad Bullet Train update Saam tv
बिझनेस

पुण्याला अवघ्या ५० मिनिटांत पोहोचता येणार; मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनचा मार्ग ठरला, प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती समोर

Mumbai-Hyderabad Bullet Train update : मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग निश्चित झाला आहे. या प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Vishal Gangurde

बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत महत्वाची अपडेट

रेल्वे मार्गाचा प्राथमिक आराखडा निश्चित

पंढरपुरातील विकासाला चालणार मिळणार

मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. हायस्पीड रेल्वे मार्गाचा प्राथमिक आराखडा निश्चित झाला आहे. 'रेल्वे अॅटलास'मध्ये या मार्गाचा उल्लेख करण्यात आलाय. बुलेट ट्रेनच्या नव्या मार्गामुळे पंढरपूर आणि सोलापूरच्या विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. हायस्पीड रेल्वे मार्गाचा प्राथमिक आराखडा निश्चित झाला आहे. 'रेल्वे अॅटलास'मध्ये या मार्गाचा उल्लेख करण्यात आलाय. बुलेट ट्रेनच्या नव्या मार्गामुळे पंढरपूर आणि सोलापूरच्या विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मुंबई-हैदराबाद हायस्पीड रेल्वे पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर , कलबुर्गी आणि विकाराबादमार्गे धावणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आता देशात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम जलदगतीने सुरू आहे. याच प्रकल्पाचा विस्तार पुढे पुणे आणि हैदराबाद करण्याची योजना आखली जात आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रल्कपाविषयी संकेत दिले होते. यामुळे मुंबई ते पुणे प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत होणार आहे, असे म्हटले जातेय.

बुलेट ट्रेनच्या मार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. मुंबई ते पुणे प्रवासाचं अंतर अवघ्या ५० मिनिटांवर येणार आहे. तर मुंबई ते सोलापूरचा प्रवास अवघ्या दीड तासांत शक्य होणार आहे. पुणे ते सोलापूर प्रवासाचं अंतर कमी होणार आहे. हे अंतर ४५ ते ५५ मिनिटांत पार होणार आहे. तर पुणे ते हैदराबाद प्रवासासाठी दोन तासांपेक्षा कमी वेळात पोहोचता येईल, असं सांगण्यात येत आहे.

सोलापूरला होणार मोठा फायदा

मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेनमुळे पंढरपूर आणि सोलापूरला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. पंढरपूरच्या धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल, असं बोलले जात आहे. या प्रकल्पामुळे देशभरातली प्रवासी अधिक जलद पंढरपुरात पोहोचू शकतील. तेथील औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्रालाही फायदा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : खर्चावर नियंत्रण ठेवा, ५ राशींच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

SCROLL FOR NEXT