Ladki Bahin Yojana google
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो, eKYC केलीत? तरीही हफ्ता थांबणार, योजनेतील सरकारचा नवीन नियम वाचलात का?

Government Schemes: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिलांचा लाभ eKYC करूनही बंद झाला आहे. सरकारने उत्पन्नाच्या नव्या अटी लागू केल्याने अनेक लाभार्थींना धक्का बसला आहे.

Sakshi Sunil Jadhav

महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो महिलांनी eKYC प्रक्रिया पूर्ण केली आहे. काहींनी ही प्रक्रिया मोबाईलवरून, तर काहींनी सीएससी केंद्रांद्वाच्या मदतीने किंवा बँकेत जाऊन केली. मात्र आता सरकारने नवीन निर्देश जारी करत काही महिलांचा लाभ थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे कौटुंबिक उत्पन्नाची अट हा महत्वाचा मुद्दा असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जर एखाद्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ ते अडीच लाखांपेक्षा जास्त असेल, तर महिलेला या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही. म्हणजेच, eKYC पूर्ण केली तरी ती फक्त ओळख पडताळणीसाठी आहे. पात्रता तपासणीसाठी नाही. सरकार पात्रता ठरवताना कुटुंबाचा उत्पन्न दाखला, इन्कम टॅक्स रेकॉर्ड, बँकचे व्यवहार आणि इतर अधिकृत माहितीचा तपास करते.

राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी आहे. उच्च उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना या योजनेचा लाभ देण्यात काही अर्थ नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे ही योजना फक्त पात्र आणि खऱ्या अर्थाने गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे.

या निर्णयामुळे अनेक महिलांनी नाराजी निर्माण झाली आहे. काहींनी सोशल मीडियावर आपली भावना व्यक्त करत म्हटले की, आम्ही eKYC केली, दस्तऐवज सादर केले, वेळ दिला, पण शेवटी उत्पन्न जास्त म्हणून नाव काढलं गेलं. ग्रामीण भागातील अनेक महिलांचे उत्पन्न प्रत्यक्षात कमी असूनही, दाखल्यांवर जास्त दाखवले जाते. त्यामुळे त्या अपात्र ठरतात.

महिला व बालविकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यभरात सुमारे 1.5 कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे. त्यापैकी अंदाजे 10 ते 15 लाख महिलांचे कुटुंब उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांचा लाभ पुढील हप्त्यापासून बंद होणार आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

SCROLL FOR NEXT