October Heatwave : 'ऑक्टोबर हीट' सुरु, 'या' दिवसांत कशी काळजी घ्याल? वाचा सविस्तर

Stay Hydrated: ऑक्टोबर हीट सुरू झाली आहे. या काळात वाढलेल्या उकाड्यामुळे शरीरावर ताण येतो. उष्णतेपासून बचावासाठी पाणी पिणे, हलके कपडे घालणे आणि योग्य आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे.
October Heatwave Begins
October Heatwave Beginsgoogle
Published On
Summary

ऑक्टोबर महिन्यात उन्हाचे प्रमाण वाढते.

या दिवसांमध्ये पाणी सतत पित राहा.

दुपारच्या वेळेस घराबाहेर पडणे टाळा.

आहारात योग्य पदार्थांचा समावेश करा.

पावसाळ्याचा परतीचा प्रवास सुरु झाला की, हिवाळ्याच्या गारव्याची वाट पाहणाऱ्यांना 'ऑक्टोबर हीट' नावाच्या अनोख्या हवामानाचा सामना करावा लागतो. विशेषतः भारतासारख्या उष्णतेच्या प्रदेशात या काळात प्रचंड उकाडा वाढतो. हा उकाडा उन्हाळ्याच्या उष्णतेसारखा नसून, त्यात आर्द्रतेचा मोठा वाटा असतो.

तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यातील उष्णता कोरडी असते, तर ऑक्टोबर हीट ही पावसानंतर हवेत राहिलेल्या आर्द्रतेमुळे निर्माण होते. या दिवसात तापमान जास्त असतं पण पावसाचा अभाव आणि कमी वाऱ्यांमुळे वातावरण जास्तच त्रासदायक बनतं. उत्तर भारत, महाराष्ट्र आणि गुजरातसारख्या भागांमध्ये ही परिस्थिती विशेषत: जाणवते. या काळात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामध्ये लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच त्रास होतो.

October Heatwave Begins
Mouth Ulcer Symptoms: तोंड येण्यापुर्वी कोणती लक्षणे दिसतात?

या गरमीच्या दिवसात शरीराच्या नैसर्गिक थंडाव्याच्या यंत्रणा ताणल्या जातात. घाम येतो आणि शरीराचं तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे थकवा, चक्कर येणे, डोकेदुखी, चिडचिड होणे, तसेच उष्णतेशी संबंधित आजार उद्भवण्याचा धोका वाढतो.

त्यामुळे या दिवसांमध्ये सुरक्षित राहण्यासाठी पुरेसं पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. दिवसभर भरपूर पाणी पित राहा आणि शरीर हायड्रेट ठेवा. हलकी, सैल आणि फिकट रंगाची कपड्यांचा वापर करा. दुपारच्या १० ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणे टाळा. घरात पंखे, कूलर किंवा एसीचा वापर करून तापमान नियंत्रणात ठेवा.

थंड पाण्याने आंघोळ करणं किंवा स्पंज बाथ केल्याने शरीराचे तापमान कमी करण्यास मदत होईल. आहारातसोबत, फळे आणि भाज्यांचा जास्त समावेश करा. कॅफिन आणि अल्कोहोल टाळा. कारण हे पदार्थ शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करतात. तसेच वृद्ध, लहान मुलं आणि दीर्घकालीन आजार असलेल्यांनी लोक या उकाड्याच्या काळात विशेष काळजी घ्यावी.

October Heatwave Begins
Alcohol Damages Liver: दारुमुळे लिव्हरवर किती गंभीर परिणाम होतो? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com