Reliance Industries Saam Digital
बिझनेस

Reliance AGM: रिलायान्स जिओ-रिटेलचा IPO केव्हा येणार? आज मुकेश अंबानी मोठी घोषणा करण्याची शक्यता

reliance agm update : मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात आज रिलायन्सची वार्षिक सर्वसाधारण बैठक होणार आहे. रिलायान्स जिओ-रिटेलच्या IPOची घोषणा होणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : देशातील रिलायन्स इंडस्ट्रीजची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण बैठक आज होणार आहे. या बैठकीदरम्यान मुकेश अंबानी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. या कंपनीच्या ३३.७१ लाख रिटेल गुंतवणूकदारांचं लक्ष रिलायन्स ग्रुपच्या reliance jio आणि reliance retail या दोन कंपन्यांच्या आयपीओच्या घोषणेवर असणार आहे. रिलायन्सचे अध्यक्ष या दोन्ही कंपन्यांबाबत भूमिका स्पष्ट करू शकतात. तसेच इतर बाबींची महत्वाची माहिती या बैठकीत देण्याची शक्यता आहे.

मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील इंडस्ट्रीज लिमिटेडची वार्षिक सर्वसाधारण बैठक आज दुपारी २ वाजता सुरु होणार आहे. या रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी हे रिलायन्स जिओ किंवा रिलायन्स रिटेलच्या आयपीओबाबत महत्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांना आयपीओबाबत महत्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. २०१९ साली झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मुकेश अंबानी यांनी संकेत दिले होते. २०१९ साली झालेल्या बैठकीत दोन्ही कंपन्यांची शेअर बाजारात लिस्टिंग पाच वर्षांत होऊ शकते, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे गुंतवणुकदारांमध्ये चर्चा सुरु झाली आहे.

रिलायन्सच्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत आयपीओवर महत्वाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत होण्याची शक्यता आहे. रिलायन्सच्या ऑइल-टू-केमिकल बिझनेसच्या भागीदारीच्या विक्रीबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त न्यू एनर्जी क्षेत्रात प्रोजेक्टशी संबंधित माहिती सांगण्यात येण्याची शक्यता आहे. आयपीओनंतर रिलायन्स जिओची ५जी सर्व्हिसबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

रिपोर्टनुसार, कंपनी ५जी नेटवर्कच्या विस्ताराविषयी महत्वाची माहिती शेअर करण्याची शक्यता आहे. जगभरातील मोठ्या टेक कंपन्या AIच्या गुंतवणूक करत आहे. रिलायन्स देखील AIबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

मुकेश अंबानी यांनी मागील वर्षी तिन्ही मुलांमध्ये व्यवसायाची वाटणी केली होती. ईशा अंबानी, आकाश अंबनी आणि अनंत अंबनी यांना रिलायन्स बोर्डावर 'नॉन एग्जिक्यटिव्ह डायरेक्टर'ची भूमिका दिली होती. तर या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत नव्या जबाबदारीबाबत घोषणा होईल का, याकडे सर्वांचं लक्ष राहील. तसेच त्यांना अतिरिक्त भूमिका दिल्या जातील का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

SCROLL FOR NEXT