केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. राज्य सरकारनेदेखील महिलांसाठी, लहान मुलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यात महिलांसाठी अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी योजना राबवण्यात आली आहे. अशीच एक योजना म्हणजे लाडली बहना योजना.
मध्य प्रदेश सरकारने २०२३ साली लाडली बहना योजना राबवली होती. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते. सरकारकडून थेट महिलांच्या खात्यात जमा केले जातात.या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. (Ladli Behna Yojana)
लाडली बहना योजनेअंतर्गत आता महिलांना ५००० रुपये दिले जाऊ शकतात, राज्य सरकारकडून याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ९ नोव्हेंबर रोजी एका सभेत याबाबत माहिती दिली आहे. लाडली बहना योजनेअंतर्गत १२५० रुपये दर महिन्याला मिळायचे. आता ही रक्कम वाढवून दिली जाणार आहे. आता ३००० रुपये दिले जाणार आहे त्यानंतर ही रक्कम ५००० करण्याची शक्यता आहे. याबाबत मोहन यादव यांनी माहिती दिली. या घोषनेनंतर महिलांना खूप जास्त आनंद झाला आहे. (MP Government Will Give 5000 Rupees To Women)
मध्य प्रदेशच्या लाडली बहना योजनेअंतर्गत सरकार लाखो महिलांना मदत करत आहे. यासाठी पात्रतेचे काही निकष निश्चित करण्यात आली आहे. गरीब कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या कुटुंबाचे उत्पन्न २.५० लाखांपेक्षा कमी आहे. त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच महिलांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य कर भरत नसायला हवा.त्याचसोबत ५ एकरपेक्षा कमी शेती असलेल्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. (Ladli Behna Yojana)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.