Motorola ने भारतीय बाजारपेठेतील ग्राहकांसाठी आपल्या G सेरिजमधील एक नवीन मिड-रेंज स्मार्टफोन लॉन्च केला आहे. स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, 12 GB पर्यंत रॅम आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर व्यतिरिक्त, या फोनमध्ये POLED सारखा उत्कृष्ट डिस्प्ले आहे.
Moto G85 5G स्मार्टफोन अर्बन ग्रे, ऑलिव्ह ग्रीन आणि कोबाल्ट ब्लू रंगांमध्ये खरेदी करता येईल. या फोनची विक्री 16 जुलै रोजी दुपारी 12 वाजता कंपनीच्या अधिकृत साइट फ्लिपकार्टवर सुरू होईल. या फोनला दोन वर्षांसाठी OS अपग्रेड आणि चार वर्षांसाठी सुरक्षा अपडेट मिळत राहतील.
उत्कृष्ट फिचर्स
डिस्प्ले: फोनमध्ये 240 Hz टच सॅम्पलिंग रेट, 120 Hz रीफ्रेश रेटसह 6.67 इंच फुल-एचडी प्लस 3D वक्र पॉलीड स्क्रीन आहे. तुम्हाला हा फोन 1600 nits पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 सह उपलब्ध असेल.
प्रोसेसर: फोनमध्ये 12 जीबी रॅमसह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6एस जनरेशन 3 चिपसेट आहेत. हा फोन 12 जीबी व्हर्चुअल रॅम सह मिळेल, याचा अर्थ तुम्हाला या फोनमध्ये 24 जीबी रॅमचा फायदा मिळेल.
कॅमेरा सेटअप: फोनच्या मागील बाजूस दोन रियर कॅमेरे, 50 मेगापिक्सेल सोनी लिटिया 600 प्राइमरी कॅमेरा सेन्सर आणि 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा सेन्सर आहेत. 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध असेल.
बॅटरी क्षमता: 5000 mAh ची शक्तिशाली बॅटरी 33 वॅट फास्ट चार्ज सपोर्टसह बाजारात मिळणार आहे.
मोटोरोलाच्या या स्मार्टफोनचे दोन प्रकार लॉन्च करण्यात आले आहेत, 8GB/128GB या मॉडेलची किंमत 17,999 रुपये आहे. 12 जीबी रॅम / 256 जीबी स्टोरेज असलेल्या टॉप मॉडेलची किंमत 19 हजार 999 रुपये आहे. फोन खरेदी करताना तुम्हाला बँक कार्डद्वारे 1,000 रुपयांची झटपट सूट मिळेल आणि जुन्या फोनची देवाणघेवाण केल्यावर1,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. ग्राहकांच्या सोयीसाठी, 9 महिन्यांपर्यंतची नो-कॉस्ट ईएमआय सुविधा देखील उपलब्ध असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.