देशभरात एअरटेल आणि जिओने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. अचानक या कंपन्यांनी आपल्या सीमकार्ड प्लानच्या किंमती वाढवल्यात. त्यामुळे सामान्य माणसाच्या खिशाला महागाईसह या खर्चाचा सुद्धा बोजा सहन करावा लागतोय. अशात मार्केटमध्ये आघाडीच्या असलेल्या टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी BSNL ने बाजारात उडी घेतलीये. BSNLकंपनी कमी किंमतीत ग्राहकांना अनलिमिटेड कॉल आणि भरपूर डेटा वापरण्यास देत आहे. त्यामुळे मार्केटमध्ये BSNL कंपनीच्या सीमची विक्री देखील वाढली आहे.
अनलिमिटेड कॉल्सचं पॅकेज किती?
BSNL कंपनीने ग्राहकांसाठी अगदी स्वस्त दरात सेवा उपलब्ध केली आहे. यामध्ये ग्राहकांना सुपरफास्ट इंटरनेट देखील देण्यात आलंय. फायबर ब्रॉडबँड असं या प्लानचं नाव आहे. 329 रुपयांच्या BSNL च्या फायबर ब्रॉडबँड प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल आणि 25Mbps वेगात 1000GB डेटा वापरता येणार आहे. तर 399 रुपयांच्या प्लानमध्ये 30Mbps स्पिडसह 1400GB डेटा देण्यात येत आहे. या प्लानची वॅलिडिटी एक महिना इतकी आहे.
कंपनीने सामान्य नागरिकांसाठी देखील काही प्लान आणले आहेत. यामध्ये 250 रुपयांहून कमी पैसे खर्च करून तुम्हाला सेवा घेता येणारेत. अवघ्या 249 रुपयांत BSNL कंपनीने बेसिक ब्रॉडबँड प्लान आणला आहे. यामध्ये 25Mbs स्पीडमध्ये 10GB डेटा मिळेल. तर आनंदाची गोष्ट म्हणजे प्लानमधील डेटा संपल्यावर तुम्हाला 2Mbps स्पीडने अनलिमिटेड डेटा वापरता येणार आहे.
आणखी एक बेसिक प्लान कंपनीने ग्राहकांसाठी आणला आहे. हा प्लान 299 रुपयांचा आहे. यामध्ये 25Mbs स्पीडमध्ये 20GB डेटा मिळणारे. या सर्व प्लानमध्ये देशभरात तुम्ही अनलिमिटेड कॉल देखील करू शकता. एकीकडे जिओ आणि एअरटेलच्या दरात वाढ तर दुसरीकडे BSNL ने खिशाला परवडतील असे दर ठेवल्याने अनेक ग्राहक याकडे खेचले गेलेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.