Moto G45 5G SAAM TV
बिझनेस

5000mAh बॅटरीसह 50MP कॅमेरासह Moto G45 5G स्मार्टफोन लाँच; किंमत फक्त १० हजार रुपये

Moto G45 5G : Motorola च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! कंपनीने Moto G45 5G फोन लाँच केला असून तुम्ही हा फोन स्वस्तात मस्त खरेदी करू शकता. ऑफर जाणून घ्या.

Shreya Maskar

Moto ने आपल्या भारतीय ग्राहकांसाठी Moto G45 5G फोन लाँच केला आहे. 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत हा फोन खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे. कंपनीने ब्रिलियंट ब्लू, ब्रिलियंट ग्रीन आणि विवा मॅजेन्टा या तीन सुंदर रंगांमध्ये फोन लाँच केले आहेत.

फोनचे फिचर्स (Features)

  • मोटोरोला फोन Qualcomm SD 6s Gen 3 6nm या प्रोसेसरचा आहे.

  • यात 6.5 इंच IPS LCD HD+ पिक्सेल रिझोल्यूशन, LCD आहे. हे 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट डिस्प्लेसह लाँच केले गेले आहे.

  • हा फोन 4GB/8GB रॅमसह डिझाइन (Design)करण्यात आला आहे.

  • या फोन ला 128GB स्टोरेज देखील आहे.

  • फोनमध्ये 8GB व्हर्चुअल रॅमची सुविधा आहे.

  • Moto G45 5G फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 18W, QC, PD चार्जिंग फीचर आहे.

  • प्रायमरी कॅमेरा 50MP चा तर सेकेंडरी कॅमेरा 8MPचा आहे.

  • फोनला 16MP फ्रंट कॅमेरा (Front Camera) दिला आहे.

moto G45 5G फोनचा सेल

मोटोरोला च्या या भन्नाट फोन ला 9,999 रुपयांनी खरेदी करू शकतो.

  • 4GB+128GB व्हेरिएंट 10,999 रुपये मध्ये लाँच केले गेले.

  • 8GB+128GB व्हेरिएंट 12,999 रुपये मध्ये लाँच केले गेले.

Moto G45 5G फोन मोटोरोला ऑफिशियल वेबसाइटवरून विकत घेऊ शकता. तसेच ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट वरूनही खरेदी करू शकता. फोनचा पहिला सेल 28 ऑगस्ट 2024 ला लाइव्ह करण्यात येणार आहे. तुम्ही क्रेडिट कार्डवरने पेमेंट केल्यास ग्राहकांना अतिरिक्त रुपये 1,000 रुपयांची सूट मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

SCROLL FOR NEXT