PM Modi announces GST reforms; milk, curd, TV, and fridge may soon become cheaper saamtv
बिझनेस

GST Reforms: दूध, दही, टीव्ही, फ्रिज होणार स्वस्त? मोदी सरकार देणार गिफ्ट

Modi Government Plans GST Reforms: पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना 'दिवाळी भेट' म्हणून जीएसटी सुधारणांची घोषणा केली. सरकार १२% आणि २८% स्लॅब काढून टाकू शकते, ज्यामुळे दूध, दही, टीव्ही आणि फ्रिज यासारख्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तू स्वस्त होतील

Bharat Jadhav

  • मोदी सरकार दिवाळीपूर्वी GST सुधारणा आणणार

  • दूध, दही, टीव्ही, फ्रिजसारख्या वस्तू स्वस्त होण्याची शक्यता

  • १२% आणि २८% GST स्लॅब रद्द होऊ शकतात

  • सामान्य नागरिक आणि MSME उद्योगांना थेट फायदा

स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी सरकार देशवासियांना दिवाळी भेट' देणार असल्याची घोषणा केली. "आम्ही राज्यांशी चर्चा केली असून दिवाळीपर्यंत जीएसटीमध्ये सुधारणा आणू, ही नागरिकांसाठी दिवाळी भेट असेल, असे पंतप्रधान म्हणाले होते. कारण सामान्य माणसाने वापरलेल्या वस्तूंवरील कर लक्षणीयरीत्या कमी केले जातील. याचा फायदा एमएसएमईंनाही होईल. पीटीआयनं सरकारी सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकार सध्याचे १२% आणि २८% जीएसटी स्लॅब रद्द करू शकते. यामुळे सध्या दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूं स्वस्त होतील.

जीएसटीमुळे सुधारणा केल्यानंतर सामान्य माणसांवरील खर्चाचा बोझा कमी होईल. दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, ज्यामुळे आपली अर्थव्यवस्था मजबूत होईल," असं पंतप्रधान मोदी आपल्या भाषणा म्हणाले होते. पंतप्रधानांनी जीएसटी दर कमी करण्याचे संकेत दिल्या असल्यानं या दिवाळीत कोणत्या गोष्टी स्वस्त होतील हे जाणून घेण्याची अनेकांना इच्छा आहे.

केंद्र सरकार सध्याचे १२% आणि २८% जीएसटी स्लॅब रद्द करू शकते आणि फक्त ५% आणि १८% जीएसटी स्लॅब ठेवू शकते. २८% कर स्लॅबमध्ये येणाऱ्या ९०% वस्तूंवरील कर १८% पर्यंत कमी करेल. तसेच १२% स्लॅबमध्ये समाविष्ट असलेल्या वस्तू ५% स्लॅबमध्ये आणण्याचा विचार सरकारचा आहे. सरकार ४०% चा नवीन स्लॅब देखील आणू शकते, ज्यामध्ये तंबाखू, पान मसाला आणि इतर लक्झरी वस्तूंचा समावेश असू शकतो.

कोणत्या वस्तू स्वस्त होऊ शकतात?

जर सरकारने १८% स्लॅबमध्ये समाविष्ट असलेल्या वस्तू ५% स्लॅबमध्ये आणल्या तर सामान्य माणसाला याचा जास्त फायदा होईल. सध्या दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंवर १८% जीएसटी आकारला जातोय. बहुतेक वस्तूंचाही १२% स्लॅबमध्ये समावेश आहे. जर १२% कर स्लॅब रद्द करून त्यात समाविष्ट असलेल्या वस्तूंवरील जीएसटी ५% केला तर त्याचा फायदा सामान्य माणसांना होईल.

दरम्यान १२% जीएसटी स्लॅबमध्ये नमकीन, भुजिया आणि इतर स्नॅक्स, ज्यूस, बदाम, अक्रोड, काजू, लोणी, तूप आणि चीज तसंच ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीचे शूज, चप्पल आणि सँडल, १००० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या साड्या, सूट आणि कुर्ता या सारखे कपडे, मोबाईल फोन, चार्जर, कम्प्युटर आणि लॅपटॉप, पॅकेज्ड आयुर्वेदिक, युनानी आणि होमिओपॅथिक औषधं, कॉन्टॅक्ट लेन्स आणि चष्मा, केसांचं तेल, साबण, टूथपेस्ट आणि शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांचा समावेश आहे.यावरील जीएसटी १२ वरून ५% पर्यंत कमी केला तर त्याचे दर कमी होतील.

फ्रिज-गीझर यांच्या स्वस्त होऊ शकतात

१८% जीएसटी दर हा मध्यम-उच्च स्लॅब आहे. या स्लॅबमध्ये अशी उत्पादनं आणि सेवांचा समावेश आहे ज्या अत्यंत आवश्यक नाहीत. बिस्किटे, केक, पेस्ट्री आणि इतर बेकरी उत्पादनं (पॅकेज्ड आणि ब्रँडेड), ब्रँडेड कॉर्नफ्लेक्स,पास्ता, मॅकरोनी, नूडल्स, ३२ इंचांपर्यंतचे एलसीडी/एलईडी टीव्ही, कॅमेरा, स्पीकर, हेडफोन, रेफ्रिजरेटर,वॉशिंग मशीन, हीटर, कॉफी मेकर,

सौंदर्यप्रसाधनं, शॅम्पू, केसांचे रंग, १००० रुपयांपेक्षा जास्त किमतीचे तयार कपडे, ५०० रुपयांपेक्षा जास्त किमतीची पादत्राणं, अॅल्युमिनियमचे दरवाजे, खिडक्या, तारा आणि केबल्स आणि काचेच्या वस्तू, तसेच प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांवर १८% जीएसटी लावण्यात येतो. जर जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात येईल असा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

SCROLL FOR NEXT