मदर डेअरीने दूध, तूप, लोणीचे दर कमी केले.
नवे दर २२ सप्टेंबरपासून लागू होणार.
सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार.
सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारनं केलेल्या जीएसटी सुधारणामुळे देशातील सामान्य जनतेला मोठा लाभ होणार आहे. दूध, तूप आणि लोणीचे दर कमी झाले आहेत. मदर डेअरीने हा निर्णय घेतला असून आपल्या सर्व उत्पादनाचे दर कमी केले आहेत.
सरकारने जीएसटी २.० मध्ये मोठ्या सुधारणा केल्यानंतर मदर डेअरीनं हा निर्णय घेतलाय. कंपनीच्या दुग्धजन्य पदार्थ आणि अन्न उत्पादनांच्या श्रेणीतील वस्तूंचे किमती कमी करण्यात आल्या आहेत. कमी केलेल्या किमती २२ सप्टेंबरपासून लागू होतील, असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. जीएसटी सुधारणांमुळे ही कपात करण्यात आलीय. ज्यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी झाले किंवा रद्द करण्यात आले.
मदर डेअरीने सांगितले की त्यांचा संपूर्ण पोर्टफोलिओ आता शून्य-कर श्रेणीत किंवा सर्वात कमी ५% स्लॅबमध्ये येतो. पनीर, बटर, चीज, तूप, मिल्कशेक आणि आईस्क्रीम यांसारख्या रोजच्या आवडीच्या पदार्थांच्या किमतीही कमी होणार आहेत. "ग्राहक-केंद्रित संस्था म्हणून आम्ही आमच्या ग्राहकांपर्यंत १००% कर लाभ पोहोचवत आहोत," असे मदर डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक मनीष बंदलीश नव्या दरांबाबत म्हणालेत.
उदाहरणार्थ, ५०० ग्रॅम बटरचा पॅक आता ३०५ रुपयांऐवजी २८५ रुपयांवर येईल. तर बटरस्कॉच कोन आइस्क्रीमची किंमत कमी होऊन ते ३५ रुपयांवरून ३० रुपयांवर येणार आहे. दरम्यान दूध पाउच स्वस्त होईल, अशी अपेक्षा करू नका, कारण ते नेहमीच जीएसटीमधून मुक्त राहिले आहे. दर कपात UHT दुधावर लागू आहे, एक लिटर टोन्ड टेट्रा पॅक दुधाची किंमत ७७ रुपयांवरून ७५ रुपयांनी कमी होईल.
दरम्यान पोली मिल्क पॅक म्हणजेच फुल क्रीम दूध, टोन्ड दूध, गाईचे दूध इ.) नेहमीच जीएसटीमधून सूट देण्यात आली असून त्यावर अजूनही सूट आहे. तसेच अमूल दूध डेअरीनेही आधीच दराबाबत स्पष्ट केलंय की, ते दुधाचे दर कमी करणार नाहीत. कारण त्यांनी दुधावर कोणतेच कर लावले नाहीत.
दरम्यान, जीएसटी २.० अंतर्गत उत्पादनांच्या किमती कमी करण्यासाठी मदर डेअरीने पहिले मोठे पाऊल उचलल्याने इतर एफएमसीजी प्रमुख कंपन्याही असेच करतील, अशी अपेक्षा ग्राहकांना आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.