Mercedes Benz EQA Google
बिझनेस

Mercedes Benz EQA: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई 4 वेळा पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह मर्सिडीजची सर्वात स्वस्त EV लाँच

Mercedes Benz EQA Price In India: मर्सिडीज कंपनीने आपली सर्वात स्वस्त ईव्ही Mercedes Benz EQA भारतात लाँच केली आहे. ही कार अॅडव्हान्स फीचर्ससह बाजारात लाँच झाली आहे. या कारची किंमत जाणून घ्या.

Siddhi Hande

भारतात सध्या इलेक्ट्रिक कारची प्रचंड क्रेझ आहे. दिवसेंदिवस इलेक्ट्रिक कारचे उत्पादन वाढत आहे. ग्राहकदेखीसल इलेक्ट्रिक कार जास्त प्रमाणात खरेदी करताना दिसत आहे. भारतात अनेक कंपन्यानी आपल्या इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत. यानंतर आता देशातील सर्वात लोकप्रिय कंपनी मर्सिडिजने आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. Merceses Benz EQA असं या कारचे नाव आहे.

आकर्षक लूक, पॉवरफुल बॅटरी पॅकने समृद्ध ही कार भारतात आता लाँच झाली आहे. या कारची सुरुवातीची किंमत ६६ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

Merceses Benz EQA कार भारतीय इलेक्ट्रिक वाहनांच्या लाइनअपमध्ये होती. भारतीय बाजारपेठेतील ही चौथी सर्वाधिक परवडणारी इलेक्ट्रिक कार आहे. कंपनीने या कारचे बुकिंग सुरु केले आहे. कारची डिलिव्हरी २०२५ पासून सुरु होणार आहे.

कंपनीने ही कार मागील वर्षी ऑगस्टमध्ये जागतिक बाजारपेठेत लाँच केली होती. या कारमध्ये क्रॉसओवर स्टायलिंग, मर्सिडिज सिग्नेचर ग्रिल आणि लाइट बार देण्यात आला आहे. या कारचा मागचा भाग EOB द्वारे प्रेरित असल्याचे दिसत आहे. कंपनीच्या या कारमध्ये १९ इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहे.

Merceses Benz EQA ही कार ७ रंगामध्ये येतो. कार पोलर व्हाइट, कॉसमॉस ब्लॅक, हाय टेक सिलव्हर, स्पेक्ट्रल ब्लू, पैटागोनिया रेड, मेटॅलिक, माउंटेन ग्रे मैग्नो हे कलर ऑप्शन देण्यात आले आहेत. Merceses Benz EQA कार अॅडव्हान्स फिचर्ससह बाजारात लाँच झाली आहे. या एसयूव्हीच्या डॅशबोर्डवर ब्लॅक लिट स्टार पॅटर्न देण्यात आला आहे.यामध्ये १०.२५ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम उपलब्ध आहे.

Merceses Benz EQA कारमध्ये 70.5 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. हा बॅटरी पॅक समोरच्या मोटरला जोडण्यात आला आहे. ही इलेक्ट्रिक मोटर 190bhp पॉवर आणि 385 Nm टॉर्क जनरेट करते. या कारचा टॉप स्पीड १६० किमी/तास आहे.

ही इलेक्ट्रिक कार एका चार्जमध्ये ५६० किमी ड्रायव्हिंग रेंज देते. कारची बॅटरी 100kW क्षमतेच्या DC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या कारची बॅटरी केवळ ३५ मिनिटात ८० टक्के चार्जिंग करते, असा कंपनीचा दावा आहे.

या कारमध्ये टच कॅपेसिटिव्ह थ्रीप स्पोर स्टियरिंग व्हील, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, डिजेटल ड्रायव्हर डिस्प्ले, हेड अप डिस्प्ले यांसारखे फीचर्स देण्यात आले आहे. याचसोबत 360 डिग्री कॅमेरा, वॅट स्पीकर, डॉल्बी साउंट सिस्टिम, अॅडव्हान्स ड्रायव्हिंग असिसटन्स सिस्टिम देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO EDLI Scheme: तुमचं PF अकाउंट आहे? तुम्हाला मिळतो ७ लाखांचा मोफत विमा; कसं? वाचा सविस्तर

मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस, हजर होण्याचे आदेश, नेमकं कारण काय? VIDEO

Onkar Elephant : नदीत अंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर अमानुष हल्ला, अंगावर सुतळी बॉम्ब फेकले अन्...

Actress Journey: योगा टीचरवर पडली डायरेक्टरची नजर, केलं फिल्ममध्ये कास्ट; आज आहे कोट्यवधीची मालकीण

मनोज जरांगेंच्या हत्येच्या कट प्रकरणी मोठी अपडेट; आरोपीचा महत्वाचा व्हिडिओ समोर, कोण अडकणार?

SCROLL FOR NEXT