Bhandara News : अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्याची दुरावस्था; स्वामी समर्थ कंपनी विरोध नागरिकांचा रस्ता रोको

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील मुजबी ते भिलवाडा या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. महामार्गाचे काम घेतलेल्या स्वामी समर्थ कंपनीचे अवजड वाहन सातत्याने वापरत असल्याने गिरोला कारधा ते सालेबर्डी सिरसघाट हा रस्ता पुर्णपणे उखडला आहे
Bhandara News
Bhandara NewsSaam tv
Published On

शुभम देशमुख 

भंडारा : भंडारा तालुक्यातील मुजबी ते भिलेवाडा या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून श्री स्वामी समर्थ कंपनीला त्याचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र रस्त्याचे काम सुरु असताना करताना कंपनीच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. यामुळे नागरिकांनी आज श्री स्वामी समर्थ या कंपनीच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करत रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. 

Bhandara News
Ahmednagar News : चोर असल्याच्या संशयावरून गावकऱ्यांकडून मारहाण; एकाचा मृत्यू, तीन जण गंभीर जखमी

भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील मुजबी ते भिलवाडा या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. महामार्गाचे काम घेतलेल्या स्वामी समर्थ कंपनीचे अवजड वाहन सातत्याने वापरत असल्याने गिरोला कारधा ते सालेबर्डी सिरसघाट हा रस्ता पुर्णपणे उखडला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकरिता समर्थ कंपनीला नागरिकांच्या वतीने अनेकदा निवेदन देण्यात आले. मात्र त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. दरम्यान आता शैक्षणिक सत्र सुरू झाले असून या मार्गाने दररोज ८०-९० विद्यार्थी प्रवास करीत असतात. मागील काही दिवसात या रस्त्याने प्रवास करताना काही विद्यार्थ्याचा अपघात होवून त्यांना गंभीर दुखापत सुध्दा झाली आहे. त्यामुळे कंपनी विरोधात नागरिकांत रोष व्यकत होत आहे. 

Bhandara News
Pimpri Chinchwad : महापालिकेच्या रुग्णालयात जमा झालेल्या रोख रकमेत घोटाळा; अधिकाऱ्यांकडून रक्कम गायब केल्याचा आरोप

दहा दिवसात रस्ता दुरुस्तीचे आश्वासन 

तसेच कंपनी राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करताना राखेचा वापर करीत असून राख वाहून नेताना ती रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतामध्ये उडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र कंपनी शेतकऱ्याला कुठलीही नुकसान भरपाई देण्यास तयार नाही. या सर्व विषयाला घेवुन आज गावकऱ्यांनी (rasta Roko) रस्ता रोको आंदोलन केला. यावेळी कंपनी प्रशासनाने आंदोलनस्थळी धाव घेत येत्या दहा दिवसात रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिल्याने आंदोलनं मागे घेण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com