Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: जिद्द! रिक्षाचालकाच्या लेकीने दुसऱ्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक; अदीबा अहमद ठरली महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS

Success Story of First Muslim IAS Officer: अदीबा अहमद या देशातील पहिल्या आयएएस अधिकारी झाल्या आहेत. अदीबाने दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवले आहे.

Siddhi Hande

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मेहनत ही खूप जास्त गरजेची असते. जर तुम्ही १०० टक्के मेहनत घेतली तर तुम्हाला नक्कीच यश मिळते. असंच यश अदीबा अहमद यांना मिळालं आहे. अदीबाने यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. यवतमाळच्या लेकीचं हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. यवतमाळची अदीबा अहमद ही महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम आयएएस ऑफिसर झाली आहे.

अदीबा अहमदने खूप मेहनत घेतली. यूपीएससी २०२४ परीक्षेत तिने १४२ रँक प्राप्त केली आहे. अदीबाने आपल्या आईवडिलांचे नाव मोठे केले आहे. अदीबाचे वडील ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहे. तर आई गृहिणी आहेत.

अदीबाचे आईवडिल दोघेही जास्त शिकलेले नाही तरीही त्यांनी आपल्या मुलीला खूप चांगले शिक्षण दिले. तिच्या पाठीशी उभे राहिले. आपल्या लेकीला स्पर्धा परीक्षेसाठी नेहमी सपोर्ट केला. अदीबानेदेखील आईवडिलांचे नाव मोठे केले.

अदीबाचे शिक्षण

अदीबाने पुण्यातील अबेदा इनामदार कॉलेजमधून अभ्यास केला. तिने उर्दू आणि मॅथ्समध्ये उच्च शिक्षण पूर्ण केले. तिने ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर लगेचच यूपीएससी परीक्षेची तयारी केली. अदीबाने आपल्या संपूर्ण यशाचे श्रेय आपल्या कुटुंबाला दिले आहे. तिच्या मामाकडून तिला यूपीएससी परीक्षा देण्याची प्रेरणा मिळाली.

अनेकदा पहिल्या प्रयत्नात यश मिळत नाही. असंच काहीसं अदीबासोबत झालं. अदीबालादेखील पहिल्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश मिळालं नाही. तिने दुसऱ्या प्रयत्नात चांगली रँक मिळवली. आता ती आयएएस म्हणून कार्यरत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Hospitalised: १०४ ताप, चेहरा थकलेला...; प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने केलं रुग्णालयात दाखल

Fresher Jobs : फ्रेशर्स आहात? जॉब शोधताय? असा Resume तयार केलात तर झटक्यात पास व्हाल Interview

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गाच्या आढावा बैठकीत मंत्री आदिती तटकरे अधिकाऱ्यांवर संतापल्या

Cricketer wedding: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अडकला लग्नाच्या बेडीत; वयाने 7 वर्ष मोठ्या मुलीसोबत बांधली लग्नगाठ

तुमचं मूल फेसबुक, इन्स्टा वापरतंय? सरकार आणतेय नवा कायदा; पालकांची परवानगी नसेल तर...

SCROLL FOR NEXT