Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: जिद्द! तिनदा UPSC क्रॅक पण मुलाखतीत फेल; हार नाही मानली; चौथ्या प्रयत्नात IAS झाला; महाराष्ट्राच्या लेकाची यशोगाथा वाचा

Success Story Of IAS Ashutosh Kulkarni: आयएएस आशुतोष कुलकर्णी यांनी तीनदा यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. ते तिन्ही अटेंम्पमध्ये मुलाखतीत अपयश मिळाले. तरीही त्यांनी हार मानली नाही.

Siddhi Hande

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मेहनत हा एकच पर्याय असतो. जर तुम्ही मेहनत केली नाही तर तुम्हाला यश मिळणार नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, असं म्हणतात. त्यामुळे यशाचे शिखर गाठायचे असेल तर अपयश पचवता आले पाहिजे. असंच अपयश आयएएश आशुतोष कुलकर्णींना (IAS Ashutosh Kulkarni) आलं. त्यांनी जवळपास ३ वेळा यूपीएससी इंटरव्ह्यू दिले. परंतु त्यांनी यश मिळाले नाही. तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा प्रयत्न केले.यावेळी तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले.

आशुतोष कुलकर्णी यांनी यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी काही स्ट्रॅटेजीने केली होती. त्यांनी प्रिलियम्स आणि मेन्ससाठी वेगवेगळी स्ट्रॅटेजी बनवली होती. परंतु दोन्ही परीक्षांचा त्यांनी एकत्र अभ्यास करण्यास सुरुवात केली.कारण प्रिलियम्सनंतर मेन्स परीक्षेसाठी अभ्यास करायला जास्त वेळ मिळत नाही.

आशुतोष यांच्या मते प्रिलियम्सआधी विद्यार्थ्यांनी मेन्स परीक्षेची तयारी करायला हवी.जर तुमच्याकडे १२ महिने असतील तर त्यातील ७-८ महिने ऑप्शनला द्यायला हवे. याचसोबत जीएस या विषयाचादेखील अभ्यास करायला हवा.

आशुतोष कुलकर्णी हे मूळचे महाराष्ट्राचे रहिवासी. ते पुण्यात राहायचे. त्यांनी इंटरमीडिएटनंतर मेकॅनितल इंजिनियरिंग पदवी प्राप्त केली. यानतर त्यांनी सिविल सर्व्हिसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी तयारीदेखील सुरु केली.

आशुतोष यांनी एकीकडे यूपीएससी परीक्षेची तयारी केली. याचसोबत त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंगनंतर एमए (हिस्ट्री)मध्ये अॅडमिशन घेतले.

आशुतोष यांनी २०१६ मध्ये पहिल्यांदा यूपीएससी (UPSC) परीक्षा दिली. त्यांनी सलग चारवेळा परीक्षा दिली. पहिल्या प्रयत्नात त्यांनी अपयश मिळाले. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नात ते इंटरव्ह्यू राउंडपर्यंत पोहचले. परंतु त्यांना यश मिळाले नाही. परंतु आशुतोष यांनी हिम्मत सोडली नाही.त्यांनी चौथ्या प्रयत्नात ४४ रँक मिळवली. २०१९ मध्ये आयएएस होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks: काकडी कापण्यापूर्वी ती घासली का जाते? 'या' कारणांमुळे तुम्हीही कराल हा प्रयत्न

Heart attack young age: आजकाल कमी वयात का येतो हार्ट अटॅक? तज्ज्ञांनी सांगितलं तरूणांमध्ये हृदयविकार वाढण्याची कारणं

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Thane News : कुपोषित मुलीच्या उपचारासाठी पैसे नाहीत, आई-वडील हतबल; उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील प्रकार

SCROLL FOR NEXT