मारुती सुझुकीने २२ सप्टेंबरपासून कारच्या किंमतीत मोठी कपात जाहीर
काही कार मॉडेल्समध्ये ₹1.29 लाखांपर्यंत कपात
GST सुधारणा झाल्यामुळे ग्राहकांना मिळणार थेट फायदा
स्विफ्ट, बलेनो, डिझायर, ऑल्टो आणि इतर कार मॉडेल्सवर कपात लागू
देशात कार तयार करणारी सर्वात मोठी कंपनी मारुती सुजुकीने मोठी घोषणा केली आहे. कंपनीने त्यांच्या कारच्या किंमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने मारुती वॅगनेर, ऑल्टो आणि इग्निस सारख्या छोट्या कारच्या किंमतीत १.२९ लाखापर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कारच्या किंमतीत कपात ही येत्या २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.
मारुती सुजुकीने गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स या कायद्यात सुधारणा केल्याने ग्राहकांना थेट फायदा पोहोचला आहे. या कंपनीच्या पोर्टफोलियोमधील मॉडेलच्या किंमतीत कपातीची घोषणा करण्यात आली आहे.
किंमतीत सुधारणा केल्यानंतर मारुती सुजुकीच्या सर्व मॉडेलच्या किंमतीत मोठा बदल झाला आहे. आता कंपनीच्या पोर्टफोलियोमध्ये मारुती S-Presso स्वस्त कार ठरली आहे. या कारच्या किंमतीत १,२९,६०० रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे.
मारुती सुजुकीची प्रसिद्ध कार स्विफ्टच्या किंमतीत ८६००० रुपयांनी कपात करण्यात आली आहे. या कारची सुरुवातीची किंमत ही ५.७९ लाख रुपये देखील आहे. काही दिवसांपूर्वी स्विफ्टच्या थर्ड जनरेशनचा मॉडेल लाँच करण्यात आला होता. त्यावेळी कारची किंमत ही ६.४९ लाख रुपये होती.
या व्यतिरिक्त बलेनोच्या दरात ८६,१०० रुपयांनी घटवण्यात आली आहे. या कारची सुरुवातीची किंमत ही ५.९९ लाख रुपये आहे. ५ स्टार सेफ्टी रेटिंग वाल्या कारची किंमत मारुती डिझायरच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. या कारची किंमतीत ८७,७०० रुपयांनी कपात करण्यात आली आहे. मारुती डिझायर या कारची सुरुवातीची किंमत ६.२६ लाख रुपये इतकी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.