Maruti Suzuki Car Discount Offers Saam Tv
बिझनेस

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

साम टिव्ही ब्युरो

Maruti Wagon R Car Discount:

मारुती सुझुकी आपल्या आय मायलेज कार वॅगन आर वर जबरदस्त सूट देत आहे. ही फाय सीटर कार आहे, जी सीएनजीमध्येही उपलब्ध. मुलांच्या सेफ्टीसाठी कारमध्ये स्टायलिश ग्रिल आणि मागील सीटवर चाइल्ड अँकरेज आहे. मारुती वॅगन आर वर 40,000 रुपयांपर्यंतची रोख सूट उपलब्ध आहे.

या हाय मायलेज कारवर कंपनी 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,100 रुपयांची कॉर्पोरेट सूट देत आहे. याशिवाय मारुती अल्टो K10 आणि S-Presso वर 58100 रुपये, मारुती सुझुकी Eeco वर 38100 रुपये, मारुती सुझुकी डिझायरवर 33100 रुपये सूट देण्यात येत आहे. ही सूट 31 मे 2024 पर्यंत आहे.

मारुती वॅगन आरची किंमत 6.70 लाख रुपये आहे. ही एक फाय सीटर हॅचबॅक सेगमेंट कार आहे, ज्यामध्ये 998 cc ते 1197 cc पर्यंतचे इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. कारचे टॉप मॉडेल 8.92 लाख रुपये एक्स-शोरूममध्ये येते. ही कार पेट्रोलवर 23.56 kmpl आणि CNG इंजिनवर 34.05 km/kg मायलेज देते.

यासोबतच मारुती डिझायर मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते. ही कार एक्स-शोरूम 8.01 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. कारचे पेट्रोल व्हर्जन 22.41 किमी/किलो मायलेज देते आणि सीएनजी इंजिन 31.12 किमी/किलो मायलेज देते. कारमध्ये 1197 सीसी इंजिन आहे. ही फाय सीटर कार मोठ्या बूट स्पेससह येते.

मारुती अल्टो K10 चे बेस मॉडेल 4.59 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे. ही पॉवरफुल कार CNG वर 33 kmpl चा हाय मायलेज देते. कारमध्ये 998 cc इंजिन आहे, हिचे टॉप मॉडेल 6.80 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे. Alto K10 65.71 bhp पॉवर जनरेट करते. कार सात आकर्षक रंगांमध्ये आणि दोन ट्रान्समिशनमध्ये येते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT