Upcoming Cars in September 2024 Saam Tv
बिझनेस

Maruti, Hyundai, MG आणि Tata या पॉवरफुल कार सप्टेंबरमध्ये करणार लॉन्च, पाहा लिस्ट

Upcoming Cars in September 2024: दिवाळीच्या अगदी आधी कार कंपन्या त्यांचे नवीन मॉडेल्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. मारुती सुझुकी ते टाटा मोटर्स त्यांच्या नवीन कार्स लॉन्च करणार आहेत, याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Satish Kengar

भारतात अवघ्या काही दिवसांत फेस्टिव्ह मंथ म्हणजेच सप्टेंबर महिना सुरू होणार आहे. सणासुदीच्या या हंगामात तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. दिवाळीच्या अगदी आधी कार कंपन्या त्यांचे नवीन मॉडेल्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. मारुती सुझुकी ते टाटा मोटर्स त्यांच्या नवीन कार्स लॉन्च करणार आहेत, याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Maruti Suzuki Dzire Facelift 2024

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी आपल्या सर्वात लोकप्रिय सेडान कार डिझायरचे फेसलिफ्ट मॉडेल भारतात लॉन्च करणार आहे. कंपनी सप्टेंबर महिन्यात नवीन Dezire फेसलिफ्ट लॉन्च करेल. नवीन मॉडेलमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्सचा समावेश करण्यात येणार आहे. कारमध्ये इलेक्ट्रिक सनरूफही पाहायला मिळेल.

यात 1.2-लिटर, Z12E पेट्रोल इंजिन मिळेल. जे 80bhp आणि 112Nm पॉवर जनरेट करेल. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशनने सुसज्ज असेल. सुरक्षेसाठी या कारमध्ये 6 एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमची सरफेस EBD सुविधा देखील असेल.

Tata Curvv ICE

टाटा मोटर्स पुढील महिन्यात आयसीई म्हणजेच पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह आपली नवीन कर्व्ह लॉन्च करेल. काही महिन्यांपूर्वी टाटा मोटर्सने कर्व ईव्ही लॉन्च केली होती. नवीन मॉडेलमध्ये या एसयूव्हीमध्ये दोन टर्बोचार्ज्ड 1.5-लिटर डिझेल इंजिनचा पर्यायही उपलब्ध असेल. ही SUV 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येईल. Curvv भारतात 2 सप्टेंबर रोजी लॉन्च होऊ शकते.

Hyundai Alcazar Facelift 2024

Hyundai Motor India 9 सप्टेंबर रोजी आपली नवीन फॅमिली SUV फेसलिफ्ट Alcazar भारतात लॉन्च करेल. नवीन Alcazar पूर्णपणे Creta वर आधारित असेल, यावेळी नवीन मॉडेलच्या डिझाइनमध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. याची केबिन पूर्णपणे नव्याने डिझाइन केली जाईल. यात 1.5-लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेल इंजिन मिळू शकते.

MG Windsor EV

MG पुढील महिन्यात भारतात तिसरी इलेक्ट्रिक कार Windsor EV लॉन्च करणार आहे. या क्रॉसओवरमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स ग्राहकांना पाहायला मिळणार आहेत. यात 18-इंच अलॉय व्हील, फ्लश डोअर हँडल, इलेक्ट्रिक टेलगेट आणि ऑल व्हील्स डिस्क ब्रेक सारखे फीचर्स मिळतील. या कारची किंमत जवळपास 15 लाख रुपये असू शकते. मात्र कंपनीने याबाबत अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

SCROLL FOR NEXT