Bajaj Freedom 125 CNG बाईकचा स्वस्त प्रकार होणार लॉन्च, जाणून घ्या किती असेल किंमत

Bajaj Freedom 125 CNG affordable variant: बजाज ऑटोने अलीकडेच भारतात आपली पहिली CNG बाईक Freedom 125 लॉन्च केली. या बाईकच्या बुकिंगमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सध्या बाईकवरील प्रतीक्षा कालावधी 3 महिन्यांहून अधिक वाढला आहे.
Bajaj Freedom 125 CNG बाईकचा स्वस्त प्रकार होणार लॉन्च, जाणून घ्या किती असेल किंमत
Bajaj Freedom 125 CNGSaam Tv
Published On

बजाज ऑटोने अलीकडेच भारतात आपली पहिली CNG बाईक Freedom 125 लॉन्च केली. अगदी काही दिवसांतच या बाईकने बाजारात आपली चांगली पकड निर्माण केली. या बाईकची किंमत 95,000 रुपयांपासून सुरू होते.

या बाईकच्या बुकिंगमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सध्या बाईकवरील प्रतीक्षा कालावधी 3 महिन्यांहून अधिक वाढला आहे. मात्र आता कंपनी या बाईकच्या स्वस्त व्हेरिएंटवर काम करत आहे, जी लवकरच बाजारात सादर केली जाऊ शकते. याचबद्दल अधिल माहिती जाणून घेऊ…

Bajaj Freedom 125 CNG बाईकचा स्वस्त प्रकार होणार लॉन्च, जाणून घ्या किती असेल किंमत
एका चार्जमध्ये मुंबई - नाशिक - मुंबई गाठणार; OLA ची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च; AI, ADAS फीचरसह किंमतही कमी

नवीन बाईकची किंमत किती असेल?

ऑटोकार इंडियाच्या रिपोर्टनुसार, बजाज ऑटो फ्रीडम 125 सीएनजी बाईकची टेस्ट करत आहे. नवीन व्हेरिएंटची किंमत किती असू शकते, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याची किंमत सुमारे 80,000 रुपये असू शकते. किंमत सोबतच यात काही फीचर्सचीही कपात केली जाऊ शकते.

बजाजच्या फ्रीडममध्ये 125cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 9.5 PS पॉवर आणि 9.7 Nm टॉर्क जनरेट करते. यात 5 स्पीड गिअरबॉक्सची सुविधा आहे. हे इंजिन अशा प्रकारे ट्यून केले गेले आहे की, ते सर्व प्रकारच्या हवामानात चांगलं परफॉर्मन्स देऊ शकतं.

Bajaj Freedom 125 CNG बाईकचा स्वस्त प्रकार होणार लॉन्च, जाणून घ्या किती असेल किंमत
जबरदस्त लूक अन् पॉवरफुल इंजिन; Mahindra Thar Roxx भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बजाज फ्रीडम 125 बाईक किफायतशीर बनवण्यासाठी कंपनीने यात 2 किलोची CNG टँक आणि 2 लिटरची इंधन टाकी दिली आहे. सीएनजी टाकी पूर्ण भरल्यावर ती 200 किलोमीटर धावेल, असं कंपनीचं म्हणणं आहे. तर दोन लिटर पेट्रोलवर ही बाईक 130 किलोमीटरपर्यंत धावेल, असंही कंपनीने सांगितलं आहे.

बजाजच्या या सीएनजी बाईकमध्ये ब्लूटूथ, डिजिटल स्पीडोमीटर, सीएनजी आणि पेट्रोल शिफ्ट बटण, यूएसबी पोर्ट आणि गीअर शिफ्ट इंडिकेटर यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत. चांगल्या ब्रेकिंगसाठी बाईकच्या पुढील टायरमध्ये डिस्क ब्रेक आणि मागील टायरमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com