Maruti Brezza Google
बिझनेस

Maruti Brezza: मारुती ब्रेझा नव्या रुपात, नव्या ढंगात; माइल्ड हायब्रिड टेक्नॉलॉजीसह मिळणार जबरदस्त मायलेज

Maruti Brezza: देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपली प्रसिद्ध एसयूव्ही मारुती ब्रेझा (Maruti Brezza) बाजारात पुन्हा एकदा लाँच केली आहे. ही कार मागील कारपेक्षा अधिक चांगल्या फीचर्ससह लाँच झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maruti Brezza Relaunched In India:

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपली प्रसिद्ध एसयूव्ही मारुती ब्रेझा (Maruti Brezza) बाजारात पुन्हा एकदा लाँच केली आहे. ही कार पूर्वीपेक्षा अधिक चांगली बनवली आहे. कंपनीची ही कार माइल्ड हायब्रिड तंत्रज्ञानासह अपडेट केली आहे. कंपनीने या एसयूव्हीचा टॉप व्हेरियंट माइल्ड-हायब्रिड टेक्नीककसह लाँच केला आहे.

कंपनीची ही नवीन एसयूव्ही आधीपेक्षा अधिक चांगले मायलेज देते. ही कार माइल्ड-हायब्रिड इंजिन आता ZXI आणि ZXI+ च्या मॅन्युअल प्रकारांमध्ये उलब्ध असेल. मारुती सुझुकीने गेल्या वर्षी माइल्ड-हायब्रिड मॅन्युअल व्हेरियंट बंद केले होते. त्यानंतर आता पुन्हा मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये माइल्ड-हायब्रिड उपलब्ध झाले आहे. यामुळे कारचे मायलेज आणखी चांगले होईल. या कारमध्ये कंपनीने आणखी नवीन फीचर्सचा समावेश केला आहे. (Latest News)

किंमत

मारुती सुझुकीची ही कार नवीन तंत्रज्ञानासह पुन्हा लाँच झाली आहे. या कारच्या Haier ZXL मॅन्युअल व्हेरियंटटी किंमत ११.०५ लाख रुपये आहे. तर ZXL+ ची किंमत १२.४८ लाख रुपये आहे. या नवीन माइल्ड हायब्रिड व्हेरियंटचे मायलेज प्रति लिटर २.५१ किलोमीटरने वाढेन,असे कंपनीने सांगितले आहे. ही नवीन एसयूव्ही 19.89kmpl पर्यंत मायलेज देईल. जे इतर व्हेरियंटपेक्षा चांगले असेल.

मारुती ब्रेझाच्या या नवीन व्हेरियंटमध्ये कंपनीने सीट्ससाठी सीट बेल्ट रिमायंडर, 260 डिग्री कॅमेरा, 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, हिल होल्ड असिस्ट यांसारखे फीचर्स समाविष्ट आहेत.

कंपनीने या कारमध्ये 1.5 लीटर 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन वापरले आहे. हे इंजिन 48V माइल्ड-हायब्रिड सिस्टिमसह येते. जे 102bhp पॉवर आणि 137Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. मारुती ब्रेझा कंपनीची ही कार सीएनजी पर्यांयामध्येदेखील उपलब्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार विजयी

Sweet Potato: रताळी म्हणजे सुपरफूड; हिवाळ्यात रताळी खाण्याचे फायदे

Relation Tips: रिलेशनमध्ये सतत माफी मागावी लागत असेल थांबा अन्यथा…

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

SCROLL FOR NEXT