Tata Motors: टाटा कारच्या किंमती १ फेब्रुवारीपासून वाढणार, किती जास्त पैसे खर्च करावे लागणार?

Tata Motors Price Increased: टाटा ही वाहन उत्पादन कंपन्यांमधील आघाडीची कंपनी आहे. कंपनी नेहमीच ग्राहकांच्या सोयीसाठी नवनवीन कार लाँच करत असते. कंपनीच्या कारची किंमत पुढील महिन्यापासून वाढणार आहे.
Tata Motors
Tata MotorsSaam tv
Published On

Tata Motors To Increase Vehicle Price From 1 February 2024:

टाटा ही वाहन उत्पादन कंपन्यांमधील आघाडीची कंपनी आहे. कंपनी नेहमीच ग्राहकांच्या सोयीसाठी नवनवीन कार लाँच करत असते. कंपनीच्या कारची किंमत पुढील महिन्यापासून वाढणार आहे. १ फेब्रुवारी २०२४ पासून कारच्या नवीन किंमती लागू होणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे. (Latest News)

टाटा मोटर्स आपल्या पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारच्या किंमतीत सरासरी ०.७ टक्क्यांनी वाढवणार आहे. यानंतर Nexon, Punch, Harrier आणि Safari सारख्या एसयूव्ही महाग होणार आहेत. याचसोबत Tiago, Altroz यासारख्या हॅचबॅक कार आणि Tigor सारख्या सेडान कार महाग होणार आहेत.

टाटा मोटर्सने याबाबत निवेदन जारी केले आहे. प्रवासी वाहनांच्या किंमती वाढ केली जाणार आहे. ही किंमत १ फेब्रुवारी २०२४ पासून लागू होईल. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने कारच्या किंमतीत वाढ झाली आहे.

२०२४ मध्ये जवळपास सर्वच कारच्या किंमतीत वाढ होणार असल्याचे दिसत आहे. याआधी मारुती सुझुकीने आपल्या वाहनांच्या किंमतीत वाढ केली होती. त्यानंतर आता टाटा मोटर्सने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Tata Motors
OnePlus 12: वायर न लावता चार्ज होईल OnePlus 12; आज बाजारात होणार लॉन्च, काय असेल किंमत जाणून घ्या

टाटा मोटर्सच्या कारच्या किंमती

टाटा मोटर्स वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये कार विकते. कंपनीच्या टाटा नेक्सॉनची किंमत ८.१० लाख ते १५.५० लाख रुपये आहे. तर टाटा नेक्सॉन ईव्ही ची किंमत १४.७४ लाख ते १९.९४ लाख रुपये आहे. टाटाच्या सर्वात स्वस्त एसयूव्हीची किंमत ६ लाख ते १०.१० लाख रुपये आहे. टाटा पंच EV ची किंमत १०.९९ लाख ते १५.४९ लाख रुपये आहे.

Tata Motors
Sukanya Samriddhi Yojana: तुमच्या मुलीच्या नावे सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यात किती पेसै आहेत? असं तपासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com