Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: १४व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी पदरात दोन मुले, जिद्द सोडली नाही, IPS झाल्या, वाचा प्रेरणादायी प्रवास

IPS N Ambika Success Stort: १४ व्या वर्षी लग्न झाले. वयाच्या १८ व्या वर्षी पदरात दोन मुले असतानाही स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. आयपीएस एन अंबिका यांनी चौथ्या प्रयत्नात यूपीएससी क्रॅक केली.

Siddhi Hande

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. मेहनतीशिवाय यश मिळत नाही. परंतु मेहनतीसोबतच तुमचा आत्मविश्वास खूप महत्त्वचा असतो. असाच आत्मविश्वास एन.अंबिका यांच्यासोबत झालं. एन. अंबिका यांचे १४ व्या वर्षी लग्न झाले. त्यांना खूप कमी वयात मुलंदेखील झाली. परंतु दोन मुलांचे संगोपन करत त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली. या काळात त्यांच्या पतीचे त्यांना खूप सहकार्य लाभले. (IPS N Ambika)

आयपीएस एन.अंबिका या तामिळनाडूच्या रहिवासी आहेत. त्यांचे खूप लहान वयात लग्न झाले. त्यांना १८ व्या वर्षी दोन मुली होत्या. परंतु मुली असतानाही त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांचे पती कॉन्स्टेबल आहेत. त्यांनी एकदा प्रजासत्ताक दिनी दोन आयपीएस अधिकाऱ्यांना सलामी दिली. यामुळेच त्यांनी आयपीएस होण्याचा निर्णय घेतला. (IPS N Ambika Success Story)

अंबिका यांनी १०वीची परीक्षा दिली. त्यानंतर त्यांनी १२वीची परीक्षा दिली. यानंतर ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी त्या चेन्नईला गेल्या. त्यांच्या पतीने मुलांचा सांभाळ केले.

अंबिका यांना यूपीएससी परीक्षेत ३ वेळा अपयश आले. तेव्हा त्यांना परत घरी परतण्याचा सल्ला त्यांच्या पतीने दिला. परंतु त्यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला. २००८ मध्ये चौथ्या प्रयत्नात त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.त्यांचा हा प्रवास सर्वांनाच प्रेरणा देईल. (Success Story)

अंबिका यांचा बालविवाह झाला होता. १८ व्या वर्षी पदरात दोन मुले होती. तरीही आयुष्यात काहीतरी मोठं करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिलं आणि ते पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत केली. त्यांना तीन प्रयत्नात अपयश आले तरीही त्यांनी चौथ्या वेळी पुन्हा प्रयत्न केले. यावेळी त्यांनी यश मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BEML Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे भरती; पात्रता काय? वाचा सविस्तर

१३ नोव्हेंबरपर्यंत टोलनाका हटवा, नाहीतर उखडून टाकू; प्रताप सरनाईकांचा इशारा|VIDEO

Maharashtra Live News Update: बारामतीत नगराध्यक्षपदासाठी ओबीसी चेहऱ्याला प्राधान्य द्यावे; सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची भावना

Pune Land Scam: पुणे येथील जमीन घोटाळा प्रकरणावर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया|VIDEO

भयंकर! मुंबईतील प्रसिद्ध रूग्णालयातील डॉक्टरांवर हल्ला; तिघे गंभीर जखमी, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT