Dhanshri Shintre
लहान मुलांसोबत प्रवास करणे ही एक आनंददायी पण आव्हानात्मक गोष्ट असते.
योग्य तयारीने हा अनुभव अधिक सुलभ आणि सुखकर होऊ शकतो.
लहान मुलांच्या सोयीसाठी प्रवासाचे वेळापत्रक तयार करा. रात्रीचा प्रवास असल्यास मुलांची झोप व्यवस्थित होईल याची काळजी घ्या.
डायपर, वाईप्स, औषधे, खाण्यासाठी हलका आहार, कपडे, खेळणी आणि बॉटल यांसारख्या वस्तू नेहमी जवळ ठेवा.
प्रवासादरम्यान मुलांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या आवडीची पुस्तके, खेळणी, किंवा मोबाइलवरील शैक्षणिक खेळांचा वापर करा.
लांब प्रवास असल्यास वेळोवेळी थांबा घ्या. मुलांना मोकळ्या हवेत खेळायला आणि विश्रांती घ्यायला संधी मिळेल.
प्रवासादरम्यान मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी बाळाचे कॅरिअर, कार सीट किंवा सीट बेल्टचा वापर करा.
प्रवासादरम्यान मुलांसाठी पोषणमूल्ययुक्त आणि पचायला हलका आहार तयार ठेवा.
NEXT: नवीन वर्ष साजरा करा 'या' परदेशी ठिकाणी, तुमच्या ट्रिपसाठी हे उत्तम ठिकाणे