March End work Saam Tv
बिझनेस

March End: मार्च संपण्याआधी ही कागदपत्रे जमा कराच, अन्यथा पगारातून होतील पैसे कट; वाचा सविस्तर

March End Do these Work: मार्च महिना संपण्याआधी तुम्हाला काही कामे करायची आहेत. तुम्हाला कर वाचवण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे जमा करायची आहे. अन्यथा तुम्हाला फटका बसू शकतो.

Siddhi Hande

मार्च महिना संपण्याआधी ही कामे कराच

आर्थिक वर्षात टॅक्स वाचवण्यासाठी ही कागदपत्रे जमा करणे आवश्यक

अन्यथा या महिन्यात पगारातून कट होईल टीडीएस

आर्थिक वर्ष २०२५-२६ संपण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. त्याआधी तुम्हाला काही कामे करणे गरजेचे आहे. करदात्यांनी काही गोष्टी करणे गरजेचे आहे. नवीन आर्थिक वर्षात काही कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. गुंतवणूकीचे पुरावे आणि कागदपत्रे जर साजर केली नाही तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात. तुमच्या मार्चच्या पगारातून कर कपात होऊ शकते.

आर्थिक वर्ष २०२५-२६मधील गुंतवणूकीचे पुरावे तुम्हाला आताच जमा करायचे आहेत.जेणेकरुन तुमचा या महिन्यात टीडीएस कट होणार नाही. त्यासाठी ही कागदपत्रे तुमच्याजवळ ठेवा.

दोन कर प्रणालींपैकी एक निवडा

सध्या देशात दोन कर प्रणाली लागू आहे. नवीन कर प्रणाली आणि जुनी कर प्रणाली. तुमच्या उत्पन्नानुसार तुम्हाला कोणती करप्रणाली जास्त फायदेशीर ठरेल, यानुसार तुम्हाला टॅक्स प्रणाली निवडायची आहे. जुन्या कर प्रणालीत जास्त प्रमाणात सवलत मिळू शकते. यासाठी मार्चपूर्वी हे पुरावे जमा करणे गरजेचे आहे.

कर सवलत मिळवण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्र जमा करावी लागणार आहे. यामध्ये बँक स्टेटमेंट, म्युच्युअल फंड किंवा भाडेकरार पावती जमा करणे गरजेचे आहे.

भाडेपावती

घरभाडे भत्ता आणि भाडे पावती जमा करणे गरजेचे आहे. घरमालकाचा पॅन नंबर असणे आवश्यक आहे.

इन्व्हेस्टमेंट पुरावे

तुम्ही जर एलआयसी, पीपीएफ, एनपीएसमध्ये गुंतवणूक करत असाल तर त्याचे पुरावे जमा करा. याचसोबत मुलांच्या शिक्षण शुल्काच्या पावत्यादेखील तुमच्या कामाला येऊ शकतात.

होमलोन सर्टिफिकेट

तुम्हाला होम लोन सर्टिफिकेट जमा करायचे आहे. व्याज आणि मुद्दलीवरील करसवलतीसाठी बँकेकडून इंटरेस्ट सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.

चुकीची माहिती देऊ नका

सध्या आयकर प्रणाली पूर्णपणे डिजिटल आहे. तुमच्या सर्व आर्थिक व्यव्हारांची माहिती Annual Information Statement (AIS) आणि Form 26AS याद्वारे दिली जाते. यामुळे चुकीची माहिती देऊ नका. चुकीची माहिती दिल्यास आयकर विभाग कारवाई करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Candidate List: मोठी बातमी! विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाकुणाला मिळाली संधी?

पहलगामची हल्ल्याची मुंबईत पुनरावृत्ती, धर्म विचारून केले चाकूचे वार

Batatyache Dhirde Recipe: खमंग आणि चविष्ट नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा बटाट्याचे धिरडे, नोट करा रेसिपी

Maharashtra News Live Update: मंत्री उदय सामंत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल

महापौर अन् उपमहापौर फिल्डवर; अधिकाऱ्यांची झाडाझडती, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT