Government Scheme Google
बिझनेस

Government Scheme: खुशखबर! महाराष्ट्रातील महिलांना दर महिन्याला मिळणार इतके पैसे; नोव्हेंबरपर्यंत करु शकतात अर्ज; जाणून घ्या डिटेल्स

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची महिलांसाठी खास योजना आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहे. या योजनेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली आहे.

Siddhi Hande

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवते. महाराष्ट्र सरकारनेदेखील महिलांसाठी योजना राबवल्या आहेत. त्यातील एक योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.

लाडकी बहीण योजना

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेत अर्ज करण्याची शेवटची तारीख नोव्हेंबर २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता महिलांना अर्ज काढण्यासाठी काही दिवस आहेत. आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले नाहीत. त्यांना अर्ज एडिट करता येणार आहे.

योजनेचे नियम

महाराष्ट्रातील रहिवासी महिला या योजनेसाठी अर्ज करु शकतात. महिला या ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. यासाठी वेबसाइट आणि अॅपचा पर्याय आहे.

अर्ज करणाऱ्या महिलेचे वय २१ ते ६५ वर्ष असावे.

विवाहित, अविवाहित, घटस्फोटित महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांचे बँकेत अकाउंट असावे.

अर्जदाराच्या कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा करावा?

महिला ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करु शकतात.अंगणवाडी सेविका/ सुपरवायजर/ ग्राम सेवक/ सीएमएम/ वार्ड ऑफिसरमार्फत तुम्ही या योजनेचा अर्ज भरु शकतात.

सरकारच्या या योजनेत तुम्ही ऑनलाइन पद्धतीनेदेखील रजिस्ट्रेशन करु शकतात. नारी शक्ती दूत अॅप किंवा वेबसाइटच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करु शकतात. या योजनेत सर्वप्रथम तु्म्हाला रजिस्टर करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT