Mahindra Thar Roxx  Saam Tv
बिझनेस

जबरदस्त लूक अन् पॉवरफुल इंजिन; Mahindra Thar Roxx भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Mahindra Thar Roxx SUV Launched In India: महिंद्राने भारतात आपली 5 डोअर थार लॉन्च केली आहे. कंपनीने स्टेशन पेट्रोल बेस मॉडेल लॉन्च केले आहे. ज्याची किंमत 12.99 लाख रुपये आहे.

Satish Kengar

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर महिंद्राने भारतात आपली 5 डोअर थार लॉन्च केली आहे. कंपनीने स्टेशन पेट्रोल बेस मॉडेल लॉन्च केले आहे. ज्याची किंमत 12.99 लाख रुपये आहे. तसेच या कारच्या डिझेल बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 13.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनी आज कारच्या मिड-सेगमेंट आणि टॉप व्हेरियंटची किंमत जाहीर करेल.

कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स

Mahindra Thar Roxx जुन्या 3 डोअर थारपेक्षा खूपच वेगळी आहे. नवीन थार पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक दिसते. कारमध्ये सनरूफसह अत्याधुनिक सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत. ही कार 2.0 लिटर टर्बो पेट्रोल आणि 2.2 लीटर टर्बो डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध असेल.

ही एक हाय पॉवर कार आहे, जी 158bhp पॉवर आणि 330Nm टॉर्क जनरेट करते. कारला 6 स्पीड ट्रान्समिशन मिळेल. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये येईल.

फीचर्स

Mahindra Thar Roxx ला ऑफ-रोडिंगवर आरामदायी प्रवासासाठी पेंटा लिंक सस्पेंशन देण्यात आले आहे. यात रायडरच्या सुरक्षेसाठी इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्टीम आहे, जी रायडरला सर्व चार चाकांवर अतिरिक्त नियंत्रण देते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कारची वॉटर-वेडिंग डेप्थ 650 मिमी आहे, त्यामुळे ती पाण्यात चालवताना कोणतीही अडचण येणार नाही.

Mahindra Thar Roxx मध्ये ग्राहकांना 10.25-इंच स्क्रीन मिळेल. ही कार डीआरएलसह प्रोजेक्टर हेडलॅम्पसह उपलब्ध असेल. कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि ऑटो एसी सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या कारमध्ये डिजिटल ड्रायव्हर मीटर आहे, ज्यामुळे ती हाय रेंज कार बनते. कारमध्ये अलॉय व्हील्स, क्रूझ कंट्रोल आणि सीट बेल्ट रिमाइंडर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. ही कार हायस्पीड अलर्टसह येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT