हायब्रीड इंजिन आणि कारप्रमाणे रिव्हर्स मोड, नवीन बदलासह येतेय Kawasaki Ninja 7 Hybrid; किंमत किती?

Kawasaki Ninja 7 Hybrid: आता लवकरच हायब्रीड बाईक्स लॉन्च केल्या जाणार आहेत. कारप्रमाणे ही बाईक ईव्ही आणि पेट्रोल इंजिनवर धावणार. दुचाकी उत्पादक कंपनी Kawasaki भारतात आपली नवीन बाईक Ninja 7 Hybrid आणणार आहे.
हायब्रीड इंजिन आणि कारप्रमाणे रिव्हर्स मोड, नवीन बदलासह येतेय Kawasaki Ninja 7 Hybrid
हायब्रीड इंजिन आणि रिव्हर्स मोड; जबरदस्त आहे 'ही' बाईक Saam Tv
Published On

इलेक्ट्रिक वाहनांनंतर आता भारतात हायब्रीड कारचा ट्रेंड वाढत आहे. यातच आता लवकरच हायब्रीड बाईक्स लॉन्च केल्या जाणार आहेत. कारप्रमाणे ही बाईक ईव्ही आणि पेट्रोल इंजिनवर धावणार. दुचाकी उत्पादक कंपनी Kawasaki भारतात आपली नवीन बाईक Ninja 7 Hybrid आणणार आहे. या हाय पॉवर पॉवरट्रेन बाईकची रनिंग कॉस्ट कमी असेल आणि प्रदूषणही कमी होईल.

Kawasaki Ninja 7 Hybrid मध्ये 451 cc चे पॉवरफुल्ल इंजिन मिळेल. ही स्पोर्ट्स बाईक रिव्हर्स मोड गियर फीचरसह येईल. ज्यामुळे ती रिव्हर्स करणे सोपे होईल. याचे इंजिन 69 HP ची पॉवर आणि हाय स्पीडसाठी 60.4 Nm टॉर्क जनरेट करेल.

हायब्रीड इंजिन आणि कारप्रमाणे रिव्हर्स मोड, नवीन बदलासह येतेय Kawasaki Ninja 7 Hybrid
Bajaj चा ग्राहकांना सुखद धक्का! 136Km रेंजसह नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Chetak लॉन्च; किंमत किती?

सध्या कंपनीने याच्या टॉप स्पीडचा खुलासा केलेला नाही. असा अंदाज आहे की, ही बाईक 144.1 ते 400 किमी/ताशी टॉप स्पीड देईल. या हाय रेंज बाईकला 4.3 चे डिजिटल मीटर मिळेल. हाय मायलेजसाठी यात 6 स्पीड गिअरबॉक्स आहे. ही बाईक 30 ते 40kmpl मायलेज देऊ शकते, असं बोललं जात आहे.

Kawasaki Ninja 7 बाईक दिसायला अतिशय स्टायलिश आहे. बाईकची लांबी 2145 mm आहे. ही बाईक 750 mm रुंद आहे आणि तिची उंची 1135 mm आहे. ही कावासाकी बाईक हाय स्पीडसाठी 4 स्ट्रोक इंजिनसह येते. ही बाईक डिस्क ब्रेक आणि अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टमसह येईल.

हायब्रीड इंजिन आणि कारप्रमाणे रिव्हर्स मोड, नवीन बदलासह येतेय Kawasaki Ninja 7 Hybrid
या दमदार बाईक्स ऑगस्टमध्ये होणार लॉन्च, 3 नंबरची बाईक आहे जबरदस्त

किती असेल किंमत?

ही बाईक मेटॅलिक ब्राइट सिल्व्हर, मेटॅलिक मॅट लाइम ग्रीन आणि इबोनी या रंग पर्यायासह येईल. ही बाईक बाजारात Triumph Bonville T100 शी स्पर्धा करेल. सध्या कंपनीने या बाईकची डिलिव्हरी डेट आणि किंमत जाहीर केलेली नाही. ही बाईक मार्च 2025 पर्यंत भारतात लॉन्च होईल, असा अंदाज आहे. ही बाईक 10.34 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये ऑफर केली जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com