Paris Olympics मधील सर्व भारतीय विजेत्यांना मिळणार आलिशान कार, MG ने केली मोठी घोषणा

MG Windsor EV: पॅरिस ऑलिम्पिक देशासाठी आतापर्यंत बऱ्यापैकी यशस्वी ठरलं आहे. सध्या भारताला तीन कांस्यपदके मिळाली आहेत. यावेळी JSW समूहाचे अध्यक्ष एमडी सज्जन जिंदाल यांनी मोठी घोषणा केली आहे.
Paris Olympics मधील सर्व भारतीय विजेत्यांना मिळणार आलिशान कार, MG ने केली मोठी घोषणा
paris olympics 2024 indian winnersSaam tv
Published On

पॅरिस ऑलिम्पिक देशासाठी आतापर्यंत बऱ्यापैकी यशस्वी ठरलं आहे. सध्या भारताला तीन कांस्यपदके मिळाली आहेत. यावेळी JSW समूहाचे अध्यक्ष एमडी सज्जन जिंदाल यांनी घोषणा केली की, कंपनी भारताच्या प्रत्येक ऑलिम्पिक पदक विजेत्याला नवीन MG Windsor इलेक्ट्रिक कार गिफ्ट करुन त्यांचा सन्मान करणार आहे.

आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत जिंदाल म्हणाले की, ‘’टीम इंडियाच्या प्रत्येक ऑलिम्पिक पदक विजेत्याला JSW MG India कडून नवीन MG Windsor भेट दिली जाईल, हे जाहीर करताना आनंद होत आहे.’’ MG च्या नवीन Windsor EV बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…

Paris Olympics मधील सर्व भारतीय विजेत्यांना मिळणार आलिशान कार, MG ने केली मोठी घोषणा
नवीम स्टाइल, दमदार इंजिनसह येतेय नवीन Royal Enfield Classic 350, 12 ऑगस्टला होणार लॉन्च

एमजी मोटर लवकरच आपली नवीन ऑल-इलेक्ट्रिक क्रॉसओवर Windsor EV लॉन्च करणार आहे. ही कंपनीची भारतातील तिसरी इलेक्ट्रिक कार असेल. याआधी कंपनीने ZS EV आणि Comet EV लॉन्च केली आहे.

नवीन MG Windsor EV दोन बॅटरी पॅकसह सादर करण्यात आली आहे, त्यापैकी एक 37.9kWh बॅटरी पॅक असेल. जो एका चार्जमध्ये 360 किलोमीटरची रेंज देईल. तर दुसरा 50.6kWh बॅटरी पॅक असेल, जो 460 किलोमीटरची रेंज देईल. भारतात ही कार Tata Nexon EV आणि Mahindra XUV400 सारख्या इलेक्ट्रिक कारशी स्पर्धा करेल. युटिलिटी कार शोधणाऱ्यांना नवीन Windsor EV आवडू शकते. ही अतिशय स्टायलिश कार असणार आहे.

Paris Olympics मधील सर्व भारतीय विजेत्यांना मिळणार आलिशान कार, MG ने केली मोठी घोषणा
'या' 4 पॉवरफुल बाईक्स ऑगस्टमध्ये होणार लॉन्च, Ola Electric बाईकचीही बाजारात होणार एन्ट्री

किती असेल किंमत?

आगामी मॉडेलची किंमत ZS EV आणि Comet EV दरम्यान असू शकत. या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात ही कार लॉन्च केली जाऊ शकते. नवीन Windsor EV ची एक्स-शो रूम किंमत 15 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते, सध्या या नवीन मॉडेलची भारतात आतुरतेने प्रतीक्षा केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com