'या' 4 पॉवरफुल बाईक्स ऑगस्टमध्ये होणार लॉन्च, Ola Electric बाईकचीही बाजारात होणार एन्ट्री

Upcoming bikes in August: या महिन्यात चार नवीन बाईक भारतात लॉन्च होणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी ओला आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक देखील सादर करू शकते.
या 4 पॉवरफुल बाईक्स ऑगस्टमध्ये होणार लॉन्च, Ola Electric बाईकचीही बाजारात होणार एन्ट्री
Ola Electric BikeSaam Tv
Published On

जर तुम्ही हेवी इंजिन असलेली नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. कारण या महिन्यात चार नवीन बाईक भारतात लॉन्च होणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी ओला आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक देखील सादर करू शकते. याशिवाय रॉयल एनफिल्ड ते येझदीपर्यंतच्या बाइक्सही लॉन्च होणार आहेत. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Ola Electric Bike

ओला इलेक्ट्रिक स्कूटरनंतर आता कंपनी आपल्या नवीन इलेक्ट्रिक बाईकवर लक्ष केंद्रित करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कंपनी या महिन्यात आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक सादर करू शकते. नवीन मॉडेल 15 ऑगस्ट रोजी लॉन्च केले जाऊ शकते. अलीकडेच कंपनीने नवीन मॉडेलचा टीझर देखील जारी केला आहे. नवीन मॉडेल एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये असेल. याची किंमत कमी असेल आणि मायलेजही जास्त असू शकते. याआधीही ओलाने 15 ऑगस्ट रोजी भारतात मॉडेल लॉन्च केले होते.

या 4 पॉवरफुल बाईक्स ऑगस्टमध्ये होणार लॉन्च, Ola Electric बाईकचीही बाजारात होणार एन्ट्री
Hero ची नवीन E Bike, 70KM मायलेज आणि किंमत फक्त 35000 रुपये, मिळणार 'हे' जबरदस्त फीचर्स
या 4 पॉवरफुल बाईक्स ऑगस्टमध्ये होणार लॉन्च, Ola Electric बाईकचीही बाजारात होणार एन्ट्री
Upcoming bikes in AugustSaam Tv

Royal Enfield Classic 350

Royal Enfield या वर्षी ऑगस्ट महिन्यात आपली नवीन Classic 350 फेसलिफ्ट सादर करू शकते. नवीन मॉडेलमध्ये किरकोळ बदल पाहायला मिळू शकतात. नवीन मॉडेलमध्ये नवीन हेडलाइट्स, नवीन रंग, पेंट स्कीम आणि अपडेटेड इंजिन मिळण्याची अपेक्षा आहे. यात डिजिटल स्पीडोमीटरही असेल, जे अनेक चांगल्या फीचर्सने सुसज्ज असेल.

Yezdi Adventure

जर तुम्ही Jawa-Yezdi चे चाहते असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अपडेटेड Yezdi Adventure बाईक यावर्षी ऑगस्टमध्ये लॉन्च होणार आहे. या बाईकची थेट स्पर्धा रॉयल एनफिल्ड हिमालयन 450 सोबत होऊ शकते. असं असलं तरी बाईकमध्ये फारसे बदल दिसणार नाहीत. अलीकडेच या बाईकचा एक टीझर देखील समोर आला आहे. ज्यामध्ये नवीन ड्युअल-टोन पेंट स्कीम आणि बाइकमध्ये नवीन ग्राफिक्स देखील पाहायला मिळत आहे. इंजिनबद्दल बोलायचे झाले तर बाईकला 334cc चे इंजिन मिळेल. याशिवाय बाईकमध्ये सस्पेन्शन, एक्झॉस्ट आणि फीचर्सही अपडेट पाहायला मिळतील.

या 4 पॉवरफुल बाईक्स ऑगस्टमध्ये होणार लॉन्च, Ola Electric बाईकचीही बाजारात होणार एन्ट्री
90 KM ची रेंज आणि 55799 रुपये किंमत, पुरुषांसह महिलांसाठी बेस्ट आहे 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर

BSA Gold Star 650

भारतात, BSA आपली नवीन गोल्ड स्टार 650 रेट्रो बाईक या महिन्यात सादर करणार आहे. इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, BSA Gold Star ला 652 cc सिंगल-सिलेंडर इंजिन मिळेल, जे 44.3 bhp आणि 55 Nm टॉर्क जनरेट करते. बाईकच्या डिझाईनमध्ये फारसे बदल होणार नाहीत, पण अनेक चांगले फीचर्स या बाईकमध्ये पाहायला मिळणार आहेत. ही बाईक ऑगस्टमध्ये कधी लॉन्च होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com