Toll Price Hike Saam Tv
बिझनेस

Toll Price Hike: प्रवास महागला! महाराष्ट्रातील टोलच्या दरात मोठी वाढ, आता किती पैसे मोजावे लागतील ?

Maharashtra Toll Price Hike : वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता टोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. राज्यात टोलच्या दरात ३ ते ५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

Siddhi Hande

वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी

टोलमध्ये दरवाढ करण्याचा निर्णय

महाराष्ट्रातील सर्व टोल नाक्यावर नवी दरवाढ लागू

सागर आव्हाड, साम टीव्ही प्रतिनिधी

महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता वाहनधारकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. आता टोलमध्ये दरवाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक टोल नाक्यावर ही दरवाढ लागूदेखील झाली आहे. टोलमध्ये तीन ते पाच टक्क्यांची दरवाढ करण्यात आली आहे.

टोलच्या दरात वाढ (Maharashtra Toll Price Hike)

राज्यात आजपासून महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरील टोल दरात सरासरी ३ ते ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनएचएआय (NHAI) च्या राज्यातील सुमारे ७० आणि एमएसआरडीसी (MSRDC) च्या ३५ प्रमुख टोलनाक्यांवर ही दरवाढ लागू आहे .त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनधारकांच्या खिशाला फटका बसणार आहे.लकार, जीप, बस आणि ट्रक अशा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी टोल महागला आहे. टोल दरात ३ ते ५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

फास्टॅग अनिवार्य

टोलमध्ये दरवाढ तर केलीच आहे याचसोबत टोलनाक्यांवर रोख व्यवहार पूर्णपणे बंद करून केवळ फास्टॅग (FASTag) किंवा डिजिटल पेमेंटद्वारे टोल भरण्याची सक्ती आहे.सोलापूर-पुणे, पुणे-मुंबई एक्सप्रेसवे, आणि इतर प्रमुख महामार्गांवर प्रवास महागला आहे.

वाढत्या महागाईच्या काळात टोलमधील या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला फटका बसणार आहे. याचसोबत आता तुम्हाला फास्टॅग किंवा ऑनलाइन यूपीआयद्वारेच टोल भरावा लागणार आहे. याआधीही याबाबत नियम जारी केले होते. मात्र, आज १ एप्रिलपासून हे नियम आणखी कठोर करण्यात आले आहेत.

घराबाहेर पडताना नेहमी तुम्ही तुमचा फास्टॅग बॅलेन्स चेक करा. जर तुमच्या फास्टॅगमध्ये पुरेसा बॅलेन्स नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही हे काम लगेच करा. याचसोबत टोल नाक्यावर आता क्यूआर कोड लावण्यात येणार आहे. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर लगेच तुम्ही टोल भरु शकतात.

या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

फास्टॅग अॅक्टिव्ह आहे की नाही हे चेक करा. फास्टॅगमधील बॅलेन्स चेक करा.

फास्टॅग नसेल तर यूपीआय किंवा डिजिटल पेमेंटचा ऑप्शन तयार ठेवा. जेणेकरुन टोल नाक्यावर तुमचा जास्त वेळ वाया जाणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्याच्या प्रशासनात 'बदली' वारे! तुकाराम मुंढेंसह 6 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे झाली बदली?

Eye Glasses Clean Tips: चष्म्यावर स्क्रॅच आलेत? मग या ७ सोप्या ट्रिक्स करा फॉलो, नव्यासारख्या दिसतील काचा

नवी मुंबई विमानतळ नामकरण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; दि.बा.पाटील यांच्या नावाची याचिका फेटाळली

Maharashtra News Live Update: खडकपूर्णा नदीतून अवैध रेती उत्खनन व वाहतूक बंद करा, नागरिकांनी रोखला जुना मुंबई-पुणे- नागपूर महामार्ग

IAS Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढेंची ४५ दिवसांत पुन्हा बदली; आता कुठे झाली नियुक्ती?

SCROLL FOR NEXT