MSC Bank SaamTV
बिझनेस

MSC Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव! 'एक्सलन्स इन सायबर सिक्युरिटी' पुरस्काराने सन्मान

MSC Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला एक्सलन्स इन सायबर सिक्युरिटी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. वाशीतील आधुनिक सायबर सुरक्षा केंद्रामुळे सहकारी बँकिंग क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.

Shruti Vilas Kadam

MSC Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. देशातील सर्वोत्कृष्ट राज्य सहकारी बँक म्हणून गौरव मिळवल्यानंतर आता बँकेला 'एक्सलन्स इन सायबर सिक्युरिटी' (Excellence in Cyber Security) या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सहकारी बँकिंग क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम वापर यासाठी हा सन्मान मिळाला आहे. या पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या सहकारी बँकिंग क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

नवी दिल्लीतील चाणक्यपुरी येथील हॉटेल अशोकामध्ये 'एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६' हा पुरस्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी फायनान्शियल सर्व्हिसेस इन्स्टिट्यूशन्स ब्युरोचे सदस्य सतीश मराठे, नॅफस्कॉबचे अध्यक्ष लक्ष्मीदास, इंडियन को-ऑपरेटिव्हचे अजय झा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सहकारी बँकांसाठी उभारले आधुनिक सायबर सुरक्षा केंद्र

सध्या डिजिटल बँकिंगचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचबरोबर ऑनलाइन फसवणूक आणि सायबर हल्ल्यांचाही धोका वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने वाशी येथे अत्याधुनिक सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर उभारले आहे. विशेष म्हणजे, राज्यातील सर्व सहकारी बँकांना सायबर सुरक्षेची सेवा मोफत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. नाबार्डचे वरिष्ठ मुख्य महाव्यवस्थापक मणीकुमार सिवरामकृष्णन यांनीही या केंद्राचे कौतुक केले आहे. देश-विदेशातील अशा प्रकारच्या केंद्रांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे हे केंद्र अत्यंत आधुनिक असल्याचे त्यांनी नमूद केले.

सहकारी बँकांना सायबर सुरक्षेचा लाभ घेण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही राज्यातील सहकारी बँकिंग क्षेत्राची शिखर बँक म्हणून काम करते. त्यामुळे इतर सहकारी बँकांना सुरक्षित आणि आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही बँक पार पाडत आहे. या सायबर सुरक्षा केंद्राच्या माध्यमातून सहकारी बँकांना सायबर हल्ल्यांपासून संरक्षण मिळण्यास मदत होणार आहे. काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि नागरी सहकारी बँकांनी या सेवेचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील सर्व जिल्हा बँकांनीही या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी केले आहे. दरम्यान, आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षित डिजिटल व्यवहार आणि सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मिळवलेला हा पुरस्कार राज्यातील सहकार क्षेत्रासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. या उपक्रमामुळे सहकारी बँकिंग व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सक्षम होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:कुर्ला फिनिक्स मॉल प्रकरणात मदरशाला पालिकेची नोटीस

शेतकरी दुष्काळात, गोकुळच्या सत्तासंघर्षासाठी वकिलांना दिले ८० लाख

दुसऱ्या प्रेमसंबंधाचा संशय अन् भयंकर शेवट! हिंजवडीत सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची हत्या

Carrot Differnce: लाल गाजर की नारंगी गाजर? आरोग्यासाठी काय जास्त फायदेशीर; जाणून घ्या दोघांमधील ७ फरक

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग|VIDEO

SCROLL FOR NEXT