Ladki Bahin Yojana Big Update  google
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

73 Lakh Women Disqualified: ई केवायसी पडताळणीनंतर लाडकी बहीण योजनेतून जवळपास ७३ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं. त्यामुळे त्यांचा १५०० रुपयांचा हप्ता बंद करण्यात आला.

Sakshi Sunil Jadhav

लाडक्या बहिणींसाठी महत्वाची अपडेट

ईकेवायसीनंतर ७३ लाख महिला अपात्र

जूनचा 1500 रुपयांचा हप्ता लवकरच मिळणार

लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो महिलांना महिलांना १५०० रुपयांचा हप्ता दिला जातो. याचा लाभ लाभार्थी महिलांना दिला जात होता. मात्र एप्रिलमध्ये पार पडलेल्या ई-केवायसी प्रोसेसनंतर अनेक अपात्र महिलांचा लाभ बंद करण्यात आला. याचं नेमकं कारण कारण आणि किती महिलांना अपात्र ठरवण्यात आलं? याची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे.

किती महिला अपात्र ठरल्या?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरु करण्यात आली. योजने अंतर्गत महिलांना दरमहिन्याला १५०० रुपयांचा हप्ता मिळतो. पण काही महिला ज्या योजनेस अपात्र ठरल्यात किंवा ज्यांनी ३० एप्रिलपर्यंत ईकेवायसी पूर्ण केली नाही अशा महिलांचा हप्ता थांबवण्यात आला. यामध्ये अंदाजे ७३ लाख महिला या अपात्र ठरल्या आणि त्यांचा हप्ता बंद केला गेला आहे.

सुत्रांनी दिलेल्यामाहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरुवातीला २.४३ कोटींहून जास्त महिला घेत होत्या. आता यात १.६ कोटींची घट झाली आहे. सप्टेंबर २०२५ पासून ते एप्रिल २०२६ पर्यंत ईकेवायसी केल्यानंतर याची पडताळणी झाली.

लाडकीचा हप्ता का बंद केला?

अपात्र ठरलेल्या किंवा वगळ्यात आलेल्या अंदाजे १२ लाख महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त होते, इतर सरकारी योजनांचा त्यांनी लाभ घेतला होता, आरटीओच्या माहितीनुसार अंदाजे ५ लाख महिलांकडे चारचाकी वाहनं होती. त्यात ५ लाख महिला या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत होत्या. त्यातल्या ४ लाखांहून अधिक महिलांनी ६५ वर्षांची वयोमर्यादा ओलांडली होती. तसेच काही महिला या सरकारी कर्मचारी होत्या. त्यामुळे लाडकी बहीण योजनेत त्या पात्र ठरल्या नाहीत. यात ई-केवायसी न केलेल्या महिलांचाही समावेश आहे. त्यामुळे जवळपास ५० लाख महिलांना या योजनेतून वगळ्यात आलं.

जूनचा हप्ता कधी येणार? (majhi ladki bahin yojana june installment date)

सध्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी खात्यात जमा होणार? हा प्रश्न पडला आहे. पण याबद्दल कोणतीही अपडेट आलेली नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच याचा निर्णय घेतला जाणार आहे. अंदाजे १० ते १५ दरम्यान जूनचा हप्ता येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: या अधिवेशनात १० विधेयकं मांडणार- मुख्यमंत्री

Pune Rain: पुण्यात तुफान पाऊस, ५ मिनिटांच्या पावसात हिंजवडीतील रस्ते जलमय, पाहा VIDEO

Monday Horoscope : पैशाची चणचण मिटणार, ५ राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chalisgaon Fort : चाळीसगावपासून हाकेच्या अंतरावरील ५ किल्ले, सुट्टीत करा इतिहासाची सफर

Pune Accident: पुण्यात भयंकर अपघात! फादर्स डेच्या दिवशी काळाचा घाला, बाप-लेकीला भरधाव वाहनानं चिरडलं

SCROLL FOR NEXT