Teerth Darshan Yojana Saam Tv
बिझनेस

Teerth Darshan Yojana: ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवण्यासाठी सरकार देतंय ३०००० रुपये; मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना नक्की आहे तरी काय?

Mukhaymantri Teerth Darshan Yojana: महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबवली आहे. तीर्थ दर्शन योजनेत ज्येष्ठ नागरिकांना ३०,००० रुपयांचे अनुदान मिळते.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारने देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्राला संतांचा खूप मोठा वारसा लाभलेला आहे. त्याचसोबत महाराष्ट्रात अनेक ठिकाणे फिरण्यासारखी आहे. महाराष्ट्राला वारकरी सांप्रदायाची, देवदेवतांची खूप मोठी परंपरा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणांना भेट देण्यासाठी लोक लांबून येतात. याच पार्श्वभूमीवर वयोवृद्ध नागरिकांना तीर्थयात्रा करणे सोपे व्हावे, यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबवण्यात आली आहे. (Mukhyamantri Teerth Darshan Yojana)

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना नेमकी आहे तरी काय? (What Is Mukhyamantri Teerth Darshan Yojana)

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत ६० वर्षांवरील नागरिकांना लाभ घेता येणार आहे. देशभरातली ६६ तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रवाशांना तीर्थ दर्शनासाठी तब्बल ३० हजारांपर्यंत अनुदान मिळणार आहे.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत देशभरातली ७३ तर महाराष्ट्रातील ६६ धार्मिक स्थळांना भेट देण्यात येणार आहे.या योजनेत एकूण १३९ धार्मिक स्थळांना भेट देता येणार आहे.

या तीर्थक्षेत्रांमध्ये वैष्णवी देवी मंदिर, अमरनाथ यात्रा, अमृतसरमधील सुवर्ण मंदिर, चारधार यात्रा, अयोध्येतील राम मंदिर, सोमनाथ मंदिर, जगन्नाथ पुरी या धार्मिक स्थळांना भेट देता येणार आहे. त्याचसोबत मुंबईतील अनेक धार्मिक स्थळांना भेट देता येणार आहे. चैत्यभूमी, सिद्धिविनायक मंदिर, माऊंट मेरी चर्च, नाशिकमधील जैन मंदिर अशा अनेक ठिकाणी भेट देता येणार आहे.

या योजनेत २.५ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना लाभ घेता येणार आहे. या योजनेत निवास, भोजन खर्ज कव्हर करण्यासाठी ३० हजार रुपये दिले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Politics : सोलापुरात शिंदे गटाच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; राजकीय वर्तुळात खळबळ

GK: भारताव्यतिरिक्त 'या' देशांमध्येही रुपया चालतो, प्रवास करण्याआधी जाणून घ्या

Big Boss 18: अशनीर ग्रोव्हरची बिग बॅासमध्ये एन्ट्री; सलमान खानने घेतली शाळा,VIDEO व्हायरल

Shahapur Vidhan Sabha : शहापूरमध्ये मोठी घडामोड; जयंत पाटलांच्या भेटीनंतर बबन हरणेंचा मविआला पाठींबा

Money Astrology: या राशींचे लोक होणार धनवान, रखडलेले पैसेही हातात मिळणार

SCROLL FOR NEXT