Government Scheme Saam Tv
बिझनेस

Government Scheme: लाडकीसाठी फडणवीस सरकारची खास योजना, तब्बल ३०० कोटींची तरतूद; मिळणार आता १० लाखांपर्यंत कर्ज, वाचा

Maharashtra Government Scheme for Women: महाराष्ट्र सरकार बचत गटातील महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज देते. उमेदच्या माध्यमातून हे कर्ज दिले जाते. या आर्थिक वर्षात ३०० कोटींचे कर्ज दिले जाणार आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची महिलांसाठी योजना

बचत गटांना मिळते कमी व्याजदरात कर्ज

या वर्षासाठी ३०० कोटींचे कर्जवाटप

राज्य सरकारने महिलांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. यातील अनेक योजनांमध्ये महिलांना स्वतः च्या पायावर उभं राहण्यासाठी मदत केली जाते. बचत गटाला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी लोन दिले जाते. सोलापूर जिल्ह्यातील बचत गटांना या आर्थिक वर्षात तब्बल ३०० कोटींचे कर्जवाटप होणार आहे.

केंद्र सरकार आणि राज्य शासनाकडून पुढच्या महिन्यापर्यंत हे कर्ज दिले जाण्याचे उद्दिष्ट आहे. सोलापूरातील तब्बल २४ हजार २०० बचत गटांना हे कर्ज दिले जाणार आहे. यामध्ये अडीच लाख महिला आहेत. यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करुन तो यशस्वी करुन दाखवण्याची इच्छा निर्माण होते. यामुळे रोजगाराची संधीदेखील निर्माण होते.

उमेद (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) या माध्यमातून बचत गटांना कर्ज मिळते. यामुळे सोलापूरातील १ लाख कुटुंबाला आधार मिळणार आहे. बचत गट उमेदच्या मदतीने बँकांकडून कर्ज घेतात. यातून व्यवसाय सुरु करतात आणि कर्जाची परतफेडदेखील करतात.

जवळपास ३० हजारांपेक्षा जास्त महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केले आहेत.याअंतर्गत सुरुवातीला ३० हजार ते १ लाख रुपयांचे कर्ज मिळायचे. आता ३ ते १० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. बचत गट हे कर्ज वाटून घेतात आणि व्यवसाय सुरु करतात. या कर्जाची परतफेडदेखील केली जाते. जर कर्जाची नियमित परतफेड केली तर बँकांकडून व्याजदरात सवलत मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणे शहरासह जिल्ह्यात पेट्रोल डिझेल पुरवठा सुरळीत

Yoga Exercise For Glowing Skin: सकाळी फक्त १० मिनिटे योगा करा, चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

Jalna–Jalgaon Railway Project: जालना ते जळगाव धावणार रेल्वे; ५,८०४ कोटींचा निधी मंजूर, १७ नवीन स्थानके असणारा नवा रेल्वे मार्ग कसा असेल?

Housing Society : मोठी बातमी! सोसायट्यांना आता 'NA' टॅक्स भरावा लागणार नाही; थकबाकीही माफ, राज्य सरकारचा निर्णय

Success Story: साताऱ्याचा ओमकार IAS झाला, ४ वेळा अपयश आलं पण हरला नाही, वाचा शेतकर्‍याच्या लेकाची यशोगाथा

SCROLL FOR NEXT