Ramai Awas Yojana Google
बिझनेस

Ramai Awas Yojana: हक्काचे घर बांधण्यासाठी सरकार करतंय आर्थिक मदत; रमाई आवास योजना नक्की आहे तरी काय?

Siddhi Hande

केंद्र सरकार आणि राज्य शासनाने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यात नागरिकांना स्वतः चे हक्काचे घर मिळावे यासाठी पीएम आवास योजना सुरु करण्यात आली आहे. तसेच राज्यात पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. यासाठी रमाई आवास घरकुल योजना राबवण्यात आली आहे.

राज्यशासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या रमाई आवास घरकुल योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

अनुसूचित जातीच्या लोकांचे राहणीमान चांगले होण्यासाठी व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा यासाठी ग्रामीण व शहरी भागांमध्ये त्यांना स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घरांच्या ठिकाणी पक्के घर देण्यासाठी सन २००८ पासून रमाई आवास घरकुल योजना राबवण्यात येते.

या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी उत्पन्न मर्यादा १ लाख रुपये तर शहरी भागातील लाभार्थ्यांसाठी ३ लाख रुपयांपर्यंत आहे. सदर योजनेंतर्गत ग्रामीण भागात घरकुल बांधण्यासाठी प्रती घरकुल (शौचालय बांधकामासह) १ लाख ३२ हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते. शहरी भागात प्रति घरकुल २ लाख ५० हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते. राज्य शासनाने सन २०२४-२५ या वर्षात या योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रासाठी ७५, नगरपरिषद क्षेत्रासाठी ९३, नगरपंचायत क्षेत्रासाठी १४ व ग्रामीण क्षेत्रासाठी ६९७ घरकुलांचे उद्दिष्ट मंजूर केले आहे.

या योजनेच्या लाभासाठी नागरी क्षेत्रातील लाभार्थ्यांनी संबंधित महानगरपालिका कार्यालय, नगर परिषद किंवा नगर पंचायत कार्यालयात तर ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांनी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी कार्यालयाकडे विहित नमुन्यात अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN: सूर्याच्या नेतृत्वाखाली या खेळाडूंना मिळू शकते संधी! टी-२० मालिकेसाठी असा असेल भारतीय संघ

Aishwariya Rai Bacchan: ऐश्वर्याने आराध्याबद्दल विचारताच दिलं सडेतोड उत्तर म्हणाली, 'ती माझी मुलगी आहे...'

BJP Leader Death: खळबळजनक! भाजप नेत्याचा रेल्वे रुळावर आढळला मृतदेह; अपघात की घातपात? तपास सुरु

Business Ideas: महिलांना घरबसल्या करता येणारे '८' व्यवसाय; होईल बम्पर कमाई

Monsoon Travel Place: चिंब पावसात मनसोक्त भिजा! महाराष्ट्रातील या पर्यटन स्थळांना द्या भेट

SCROLL FOR NEXT