Government to provide subsidy for building cattle sheds to promote dairy farming and increase farmer income. saam tv
बिझनेस

Government Scheme: पशुपालनाचा व्यवसाय करायचाय,पण गोठा नाहीये; सरकार देणार गाई-म्हशींच्या गोठ्यासाठी अनुदान, कुठे कराल अर्ज?

Subsidy for Building Cow and Buffalo Sheds : गायी आणि म्हशींचे गोठे बांधण्यासाठी सरकारने अनुदान जाहीर केले आहे. दुग्धव्यवसायासाठी आर्थिक मदत मिळविण्यासाठी आणि A2 दूध आणि सेंद्रिय शेतीद्वारे त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकरी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Bharat Jadhav

  • गायी-म्हशींच्या गोठ्यासाठी सरकारकडून अनुदान मिळणार आहे.

  • अर्जदार शेतकरी ऑनलाइन किंवा कृषी विभागात अर्ज करू शकतात.

  • A2 दूध, शेण व मूत्र विक्रीतून शेतकऱ्यांना जास्त नफा मिळू शकतो.

नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेतीच्या वाढत्या लोकप्रियतेसह गायींची मागणी देखील वाढतेय. अनेकजण लोक गायीपालनाद्वारे लाखोंचे उत्पन्न कमवत आहेत. देशी गायी दररोज ३० ते ३५ लिटर उच्च दर्जाचे A2 दूध देतात. हे दूध ५० ते ७० रुपये प्रति लिटरला विकले जातं. शेण आणि मूत्राची मागणीही वाढतेय, हे गायीच्या दुधापेक्षाही जास्त किमतीला विकलं जातं. ( (Maharashtra Government Subsidy For Cattle Shed: Apply Online For Dairy Farming Support)

केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे गायींच्या संगोपनावर अनुदान योजनांचा लाभ देखील देतात. जर तुम्हाला दुधाचा व्यवसाय करायचा असेल आणि तुमच्याकडे गायी आणि म्हशी असतील पण त्यासाठी गोठा नसेल तर काळजी करू नका. कारण सरकार तुम्हाला गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत करेल.

काय आहे योजना

शरद पवार ग्राम समृद्धी योजनेकडून पक्का गोठा बांधण्यासाठी अनुदान दिलं जातं. फेब्रुवारी २०२१ पासून ही योजना राज्यभरात राबवली जाते.या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना जनावारांच्या संख्येनुसार गोठा बांधण्यासाठी अनुदान दिलं जातं. हे अनुदान २.३१ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिलं जातं. शेतकऱ्यांकडे असलेल्या जनावरांच्या संख्येनुसार सरकार अनुदान देत असते. जर शेतकऱ्यांकडे २ ते ६ जनावरे असतील तर एक गोठा बांधता येईल आणि त्यासाठी सरकार ७७ हजार रुपयांचे अनुदान देईल. १२ गुरांसाठी दुप्पट अनुदान दिलं जातं. तर १८ पेक्षा जास्त जनावरांसाठी तिप्पट म्हणजेच २.३१ लाख रुपयांचे अनुदान दिलं जातं.

कुठे आणि कसा करायचा अर्ज?

या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला गोठा बांधण्यासाठी अनुदान घ्यायचे असेल तर तुम्ही ग्रामपंचायतीत जाऊन अर्ज करावा लागेल. किंवा तुम्ही तुमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाती अर्ज करू शकतात. तसेच तु्म्ही पंचायत समितीतही अर्ज करू शकतात. अर्जासोबत शेतकऱ्यांना काही कागदपत्रे जमा करावे लागतील.

कोणती कागदपत्रे आहेत आवश्यक?

सातबारा, ८ अ उतारा

रहिवासी दाखला

मनरेगा जॉब कार्ड, ग्रामपंचायत मालमत्ता नमुना ८ अ चा उतारा

ग्रामसभेचा एक ठराव द्यावा लागेल.यासोबत सरपंच आणि ग्रामसेवकांच्या सहीचं एक शिफारस पत्र लागेल. यात लाभार्थी हा या कामाचा लाभ घेण्यास पात्र असल्याचं सांगितलं जातं. अर्ज दाखल केल्यानंतर तुमच्या कागदपत्र आणि अर्जाची छाननी होईल.

त्यानंतर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्यानुसार पोचपावती दिली जाते. यात अर्जदार योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे की नाही हे नमूद केलं जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT