FUEL PRICE HIKE IN INDIA  Saam Tv
बिझनेस

Petrol Price Hike: महागाईचा स्फोट! पेट्रोल 10 दिवसांत 7.50 रुपयांनी महागले, तुटवडा असतानाच दरवाढीचा भडका

FUEL PRICE HIKE IN INDIA: पेट्रोल -डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल 10 दिवसांत 7.50 रुपयांनी महाग झाले आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी चिंतेत आला आहे.

Priya More
  • राज्यात इंधन टंचाई असतानाच दरवाढीचा भडका उडाला

  • पेट्रोल-डिझेलचे दर १० दिवसांत ७.५० रुपयांनी वाढले

  • शेतकरी आणि सामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडलेत

  • विरोधकांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली

गिरीश निकम, साम टीव्ही

एकीकडे डिझेल मिळत नसल्यानं ऐन हंगामात शेतकरी त्रस्त असतानाच दुसरीकडे इंधन दरवाढीचा भडका उडालाय. पेट्रोल 10 दिवसांत 7 रुपये 50 पैशांनी महागलंय. महागाईच्या वणव्यात जनता होरपळली जातेय. यावर वाहनधारकांनी काय प्रतिक्रीया दिल्यात ? विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर कसा प्रहार केलाय ? पाहूया एक रिपोर्ट...

एकीकडे पेट्रोल-डिझेलची टंचाई आणि दुसरीकडे इंधन दरवाढीमुळे सामान्य जनता मेटाकुटीला आलीये. इंधन दराचा भडका उडाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा फटका बसलाय. सोमवारी पेट्रोलचे दर प्रति लीटर 2.61 रुपयांनी, तर डिझेलचे दर प्रति लीटर 2.71 रुपयांनी वाढले आहेत. गेल्या दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेल जवळपास 7.50 रुपयांनी महागले आहेत. गेल्या दहा दिवसात इंधनाचे दर टप्याटप्याने वाढवले गेले.

महागाईनं होरपळलेल्या सामान्य जनतेने या पेट्रोल दरवाढीवर संताप व्यक्त केलाय. या दरवाढीनंतर विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांवर प्रहार केलाय. अर्थव्यवस्था कोलमडण्याची परिस्थिती आली आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रीया सुळेंनी दिलीये. तर सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दरवाढ होत असल्याची टीका काँग्रेसने केलीये.

सामान्य जनतेचा आक्रोश असतानाच विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांवर प्रहार केलाय. अशा स्थितीत मुख्यमंत्र्यांनी मात्र सारवासारव केली आहे. सर्व गोष्टींवर पंतप्रधान उपाययोजना करतील, अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

दरम्यान, अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी झाल्याने कच्च्या तेलाचे दर १०० डॉलरच्या खाली घसरले आहेत. आता जागतिक तेल वाहतूक होणाऱ्या होर्मूजच्या जलमार्गावरील निर्बंध कधी हटणार याकडे सर्व राष्ट्रांचं लक्ष आहे. राज्यातही खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांसमोर इंधन तुटवड्याचं आणि महागाईचं संकट आ वासून उभं राहिलं आहे. हे चित्र कधी बदलणार हाच खरा सवाल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT