Budget 2025 Maharashtra : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संबंधित माहिती अजित पवार यांनी दिली. दरम्यान लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना २,१०० रुपये खात्यामध्ये जमा होण्याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. असे असले तरीही अर्थसंकल्पामध्ये सर्वाधिक तरतूद ही महिला व बालविकास खात्यासाठी करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी मागच्या वर्षी ३३ हजार २३२ कोटी रुपये खर्च केल्याचे अजित पवारांनी सांगितले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सुमारे २ कोटी ५३ लाख महिलांना आर्थिक लाभ देण्यात आला. या योजनेतून मिळालेल्या रकमेचा वापर महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी भांडवल म्हणून केला असल्याने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना हाती घेण्याचे विचारधीन असल्याचे अजित पवार म्हणाले. लाडकी बहीण योजनेत आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ३६००० कोटीं रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
वर्ष २०२५-२६ साठी विभागनिहाय राज्यस्तरीय अंदाजित खर्च (कोटी रुपयांमध्ये)
1) महिला व बालविकास - 31907.00
2) उर्जा - 21534.00
3) सार्वजनिक बांधकाम-रस्ते (सार्वजनिक उपक्रम वगळून) - 19079.00
4) जलसंपदा - 15932.00
5) ग्रामविकास - 11480.00
6) नगर विकास - 10629.00
7) कृषि - 9710.00
8) नियोजन - 9060.45
9) इतर मागास बहुजन कल्याण - 4368.00
10) मृद व जलसंधारण - 4247.00
11) पाणी पुरवठा व स्वच्छता - 3875.00
12) सार्वजनिक आरोग्य - 3827.00
13) गृह (परिवहन) - 3610.00
14) शालेय शिक्षण - 2959.00
15) सामाजिक न्याय - 2923.00
16) वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये - 2517.00
17) वने - 2507.00
18) गृह -पोलीस - 2237.00
19) नियोजन-रोजगार हमी योजना - 2205.00
20) पर्यटन - 1973.00
21) उच्च शिक्षण - 810.00
22) दिव्यांग कल्याण - 1526.00
23) सार्वजनिक बांधकाम-रस्ते (सार्वजनिक उपक्रम) - 857.00
24) तंत्र शिक्षण - 2288.00
25) सार्वजनिक बांधकाम-इमारती - 1367.00
26) सामान्य प्रशासन - 1299.50
27) गृह निर्माण - 1246.55
28) सांस्कृतिक कार्य - 1186.00
29) माहिती व तंत्रज्ञान - 1052.50
30) उद्योग - 1021.00
31) सहकार - 855.00
32) अल्पसंख्यांक विकास - 812.00
33) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता - 807.00
34) वस्त्रोद्योग - 774.00
35) विधी व न्याय - 759.00
36) फलोत्पादन - 708.00
37) मदत व पुनर्वसन - 638.00
38) माहिती व जनसंपर्क - 547.00
39) महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय - 547.00
40) क्रीडा - 537.00
41) अन्न व नागरी पुरवठा - 526.00
42) गृह- बंदरे - 484.00
43) महसूल - 474.00
44) लाभक्षेत्र विकास - 411.00
45) पणन - 323.00
46) पशुसंवर्धन - 390.00
47) पर्यावरण व वातावरणीय बदल - 245.00
48) मत्स्यव्यवसाय - 240.00
49) वित्त - 208.00
50) कामगार - 171.00
51) गृह-राज्य उत्पादन शुल्क - 153.00
52) खारभूमी - 113.00
53) मराठी भाषा - 225.00
54) अन्न व औषध प्रशासन - 57.00
55) दुग्धव्यवसाय - 5.00
एकूण खर्च - 190242.00
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.