Uddhav Thackeray : मारल्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी; अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे काय म्हणाले? VIDEO

Uddhav Thackeray Criticism on Mahayuti Government : अर्थसंकल्पावरून उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर टीका केली. मारल्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी, असं म्हणत ठाकरेंनी टीका केली.
Uddhav Thackeray Latest News
Uddhav ThackeraySaam tv
Published On

मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केला. अजित पवारांनी अर्थसंकल्पांत राज्यातील विविध प्रकल्पाची माहिती दिली. मात्र, यंदा अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. तसेच लाडक्या बहिणीच्या योजनेच्या रक्कमेत वाढ केली. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. अर्थसंकल्पावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर टीका केली आहे. मारल्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावरून महायुतीला टोला लगावला आहे.

Uddhav Thackeray Latest News
Maharashtra Budget: अर्थसंकल्पातील २१ ठळक मुद्दे, अजित पवारांनी कोणकोणत्या घोषणा केल्या?

उद्धव ठाकरे म्हणाले, 'महाराष्ट्र खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. भाजपच्या संकल्प पत्रातील एक तरी संकल्प त्यांनी मांडला का? या संकल्पातील एक तरी गोष्ट अर्थसंकल्पात मांडली का? हे संकल्प कधी होणार. २०५० साली करणार? मग याला या वर्षीचा अर्थसंकल्प म्हणता येणार नाही. आधीचे कामे सुरु आहेत. जी कामे नव्याने करणार आहेत, ती उद्या-परवा करू. अशा पद्धतीचं अर्थसंकल्प आहे. अत्यंत बोगस अर्थसंकल्प आहे. एक रुपयांमध्ये विमा होता. ती योजना बंद पडली. या सर्व योजना गडबड घोटाळ्याच्या योजना आहेत'.

Uddhav Thackeray Latest News
Maharashtra Budget 2025 : 64 हजार 755 कोटींचा समृद्धी महामार्ग, काम किती टक्के पूर्ण झालं? अजित पवारांनी दिली खडानखडा माहिती

'सहकारी साखर कारखाने यांच्या बगलबच्च्यांचे आहेत. या कारखान्यांची थकहमी बंद केली होती. कारण ती लूट आहे. साध्या शेतकऱ्यांना थकहमी देत नाही. महापालिकेची थकहमी कधी देणार. आमच्या काळात आम्ही बेस्टला मदत करत होतो. लाडक्या बहिणींसाठी २१०० रुपये दिले नाही. त्यांनी आश्वासन दिलं होतं. पण त्यांनी पूर्ण केलं नाही. मारल्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी. ही लोकांची फसवणूक आहे. फसवणूक करून सत्ता मिळवली आहे. लोकांची आश्वासने पूर्ण करा. आता रस्त्याची कामे काढली आहेत. त्यामुळे रस्त्यावर उतरायचं कसं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

Uddhav Thackeray Latest News
Ladki Bahin Yojana : भंडाऱ्यात १७ हजार लाडक्या बहिणी अपात्र; विविध कारणांनी प्रस्ताव केले रद्द

'सरकारचं लक्ष लाडक्या बहिणीवर नसून...'

समुद्धी महामार्गावरील खर्चावरून उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं. 'सरकारचं लक्ष हे लाडक्या बहिणीवर नसून लाडक्या कंत्राटदाराकडे आहे. त्यांची लाडके कंत्राटदार योजना आहे. त्यांनी अर्थसंकल्प गिळला आहे,अशा शब्दात ठाकरेंनी सरकारवर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com