Sambhaji Brigade : PM मोदींच्या मुंंबई दौऱ्यात आंदोलन करणार, संभाजी ब्रिगेडचा इशारा

Mumbai News : मुंबई मेट्रो ३ प्रकल्पामुळे १,३०० कुटुंबांचे पुनर्वसन करावे लागले. या रहिवाशांना अनेक नागरी समस्या भेडसावत आहेत. या समस्यांच्या मुद्यावरुन संभाजी ब्रिगेड संघटना आक्रमक झाली आहे.
pm modi mumbai visit
pm modi mumbai visit saam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही, प्रतिनिधी

मुंबईत भुयारी मेट्रो मार्ग प्रकल्पाला वेग आला आहे. तरीही प्रकल्प बाधितांची आठ वर्षांपासून दयनीय अवस्था आहे. मेट्रो ३ प्रकल्पामुळे बाधित झालेल्या तेराशे कुटुंबांचे अंधेरी चकाला येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. या रहिवाशांना अनेक नागरी समस्या भेडसावत आहेत. या प्रकरणावरुन संभाजी ब्रिगेड आक्रमक झाले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमएमआरसीच्या व्यवस्थापिका अश्विनी भिडे यांनी जर आठ दिवसांमध्ये पुनर्वसित रहिवाशांचे प्रश्न सोडवले नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामध्ये आंदोलन करु असा इशारा संभाजी ब्रिगेड संघटनेकडून देण्यात आला आहे. आज रहिवाशांसह संघटनेने वांद्रे येथील एमएमआरसीच्या कार्यालयात जाऊन निवेदन दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, २०१७ साली १३०० पेक्षा जास्त कुटुंबीयांचे विस्थापन मेट्रो ३ प्रकल्पामुळे अंधेरी पूर्व चकाला या ठिकाणी करण्यात आले. मात्र पुनर्वसन होऊन ८ वर्षे झाली, तरीही रहिवाशी मुलभूत गरजांपासून वंचित असल्याचे दिसून येत आहेत. या पुनर्वसन इमारतीमधील गळतीची समस्या रहिवाशांना भेडसावत आहे. रहिवाशांना स्वच्छ पिण्याचा पाण्यापासून देखील वंचित रहावे लागत आहे. ड्रेनेज लाईनची मोठी समस्या असून सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा कोणत्याही उपाय योजना नसल्यामुळे प्रकल्प बाधित नागरिक विविध समस्यांना सामोरे जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

pm modi mumbai visit
Maharashtra Budget 2025 Highlights: लाडकी बहीण, शेतकरी, रस्ते-मेट्रो,विद्यार्थी; अर्थसंकल्पात काय काय? वाचा सविस्तर

मागील अनेक वर्ष पासून मागणी करून देखील एम.एम.आर.सी.एल. प्रशासन व खाजगी विकासकाकडून कोणतीच दखल घेतली नसल्याचे दिसून येत आहे. अखेर या पुनर्वसन इमारतीतील प्रकल्पग्रस्त पीडित नागरिकांनी संभाजी ब्रिगेडकडे धाव घेतली. या संदर्भात प्रकल्पग्रस्त रहिवाशांसोबत संबधीत अधिकारी वर्गाची बैठक नियोजित करून सर्व समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघावा, यासाठी प्रयत्न करण्याचा संभाजी ब्रिगेड करून प्रयत्न केला जात आहे.

pm modi mumbai visit
Maharashtra Budget 2025: लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार का? अजित पवारांनी अर्थसंकल्पात काय सांगितलं?

मात्र मागील अनेक महिलांपासून एमएमआरसी प्रशासनाला निवेदन देऊन देखील निवेदनाची दखल घेतली जात नसल्यामुळे आज रहिवाशांनी एमएमआरसी कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन केले. जर पुढे आठ दिवसात एमएमआरसीए च्या व्यवस्थापिका अश्विनी भिडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रहिवाशांच्या समस्या सोडवल्या नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामध्ये आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आला.

pm modi mumbai visit
Maharashtra Budget : लाडक्या बहि‍णींच्या पदरी निराशाच, ₹२१०० मिळणार नाहीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com