LPG Rules 2026 ai
बिझनेस

LPG Rules 2026 Update : LPG नियमात पुन्हा बदल, पाईप गॅस कनेक्शन असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच

PNG Connection : तुमच्याकडे गॅस पाईप लाईन आणि सिलेंडर दोन्ही असेल तर ही महत्वाची माहिती तुमच्याचसाठी आहे. पुढील माहितीत आपण यासंदर्भातले बदललेले नियम जाणून घेणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

केंद्र सरकारने LPG संदर्भात मोठा निर्णय घेतला

PNG कनेक्शन घेतलेल्या ग्राहकांसाठी महत्वाचा माहिती

ग्राहकांना कनेक्शन ट्रान्सफरची संधी मिळणार

सध्या LPG सिलेंडरच्या नियमात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहेत. केंद्र सरकारने नागरिकांच्या सोयीसाठी नियमात बदल केला आहे. यामध्ये ज्या ग्राहकांनी गॅस पाईप लाईन म्हणजेच पीएनजी कनेक्शन घेतलं आहे, त्यांना जास्त सोयीसुविधा देणं हा यामागचा उद्देश आहे.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय

केंद्र सरकारने २५ मे २०२६ रोजी "लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (पुरवठा आणि वितरण नियमन) सुधारणा आदेश, २०२६" हा निर्णय घेतला. ज्या ग्राहकांकडे PNG कनेक्शन आहे, त्यांना त्यांच्याकडचे LPG कनेक्शन परत करणं आता अनिवार्य केलं जाणार नाही. हा मोठा निर्णय नागरिकांसाठी आणि हॉटेल व्यावसायिकांसाठी खूप महत्वाचा असणार आहे.

नियम बदलण्याचे कारण काय?

सध्याच्या मध्य पूर्वेतल्या ताणामुळे सिलेंडरच्या किमतीमध्येही वाढ करण्यात आली होती. तसेच LPG सिलेंडर देण्याचा कालावधीही वाढवण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना अनेककाळ संताप सहन करावा लागला होता. त्यातच केंद्र सरकारने ही महत्वाची माहिती दिली.

सरकारकडून विशेष मदत

केंद्र सरकारने पीएनजी कनेक्शनसाठीच्या अर्जांवर सात दिवसांच्या आत प्रक्रिया करण्याचे आदेश जारी केले आहेत. जर तुम्हाला पीएनजी कनेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला जास्तीच्या सुविधा देण्याची योजना सरकार प्लान करत आहे.

LPG चे नवीन नियम

आता नवीन नियमांनुसार LPG ग्राहकांकडे २ ऑप्शन असतील. जर तुम्ही PNG कनेक्शन घेतलं , तर तुम्ही ३० दिवसांच्या आत तुमचं LPG कनेक्शन बंद करण्यासाठी अर्ज करू शकतात. दुसरा ऑप्शन म्हणजे, तुम्ही भविष्यात LPG कनेक्शन पुन्हा सुरू करण्यासाठी ट्रान्सफर व्हाउचर मिळवू शकतात. सरकारच्या मते, या नियमांचा फायदा जे लोक रोजगार, शिक्षण किंवा इतर कारणांसाठी सतत वेगवेगळ्या शहरांमध्ये स्थलांतरित होतात. तिथे पीएनजी सेवा उपलब्ध नसतात. त्यांच्यासाठी याचा फायदा होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेश भक्तासांठी आनंदाची बातमी! सिद्धिविनायक मंदिराचा होणार कायापालट; पाहा कसं दिसेल मंदिर?

Maharashtra News Live Update: चांदवडमध्ये आंदोलनादरम्यान गोंधळ

Paan Skin Care : विड्याचं पान त्वचेसाठी वरदान; 'असा' करा वापर, उन्हानं काळवंडलेला चेहरा नव्याने चमकेल

Salman Khan : सलमान खानचं इन्स्टाग्राम अकाउंट अचानक Inactive का झालं? चाहते गोंधळात

Lata Pharande : महिला सरपंचाने केला मोठा घोटाळा, प्रशासनाकडून मोठी कारवाई, साताऱ्यात राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT