LPG Price Saam Tv
बिझनेस

LPG Price: सर्वसामान्यांना दिलासा! LPG गॅसच्या किंमतीत घट; किंमती ५८ रुपयांनी घसरल्या

Today LPG Price 1st July 2025 : सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल झाला आहे. एलपीजी गॅसच्या किंमतीत घट झाली आहे.

Siddhi Hande

दर महिन्याच्या एक तारखेला एलपीजी गॅसच्या नवीन किंमती जाहीर होत असतात. आज पुन्हा ऑइल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या नवीन किंमती अपडेट केल्या आहेत. आज सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज एलपीजी गॅसच्या किंमती कमी झाल्या झाल्या आहेत. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी गॅसच्या किंमती जाहीर केल्या आहेत.

सिलिंडरच्या किंमतीत ५८.५० रुपयांनी घट

जुलै महिन्यात १९ किलो वजनाच्या कमर्शियल सिलिंडरच्या किंमतीत ५८.५० रुपयांनी कपात झाली आहे. हे नवीन आजपासून देशभर लागू करण्यात आले आहेत. यामुळे मुंबईत १९ किलो वजनाच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरची किंमत १६१६ होणार आहे. ही किंमत मे महिन्यात १६९९ रुपये होते.

शहरांमधील सिलिंडरच्या किंमती (LPG Gas Price Cut)

इतर शहरांमध्येही सिलिंडरच्या किंमतीत कपात झाली आहे. दिल्लीत १९ किलो वजनाचे सिलिंडरची किंमक आजपासून १६६५ रुपये होणार आहे. ही किंमत याआधी १७२३.५० रुपये होती. कोलकत्तामध्ये सिलिंडरची किंमत १७६९ रुपये झाली आहे. या किंमतीत ५७ रुपयांनी घट झाली आहे.

कमर्शियल सिलिंडरच्या किंमतीत कपात झाली आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबा अशा व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे. या ठिकाणी कमर्शियल गॅस वापरला जातो. दरम्यान, घरगुती एलपीजी गॅसच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.या किंमती जशाच तशा आहेत.

याआधीही जून महिन्यात एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल झाला होता. कमर्शियल गॅसच्या किंमतीत २४ रुपयांनी घट झाली होती. त्यामुळे सलग दुसऱ्या महिन्यात एलपीजी गॅसच्या किंमती कमी झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Disha Salian Case: संजय राऊतांचा नितेश राणेंवर हल्लाबोल; पिक्चर अभी बाकी, नितेश राणेंचं प्रत्युत्तर

Ladki Bahin Yojana : सरकारी लाडकींना अखेर दणका, 2,289 जणांचा लाभ बंद; आता निलंबन कधी? VIDEO

SCROLL FOR NEXT