LPG Price Hike Saam Tv
बिझनेस

LPG Price Hike: अर्थसंकल्पापूर्वी सर्वसामान्यांच्या खिशाला फटका! LPG गॅसच्या किंमती वाढल्या; वाचा नवीन दर

LPG Cylinder Price Hike Before Budget 2026: अर्थसंकल्पापूर्वीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसला आहे. एलपीजी गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. एलपीजीच्या किंमती जवळपास ५० रुपयांनी वाढल्या आहेत.

Siddhi Hande

अर्थसंकल्पापूर्वी मोठा निर्णय

एलपीजी गॅसच्या किंमती वाढल्या

सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

आज १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पापूर्वीच सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. एलपीजी गॅस सिलेंडरसाठी तुम्हाला आता जास्त पैसे मोजावे लागणार आहे.

१ तारखेला जाहीर होतात एलपीजी गॅसच्या नवीन किंमती

दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी गॅसच्या नवीन किंमती जाहीर केल्या जातात. आज १ फेब्रुवारी रोजी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. १९ किलो वजनाच्या कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. देशातील सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी हे दर जारी केले आहे.

एलपीजी गॅस ५० रुपयांनी महगला (LPG Gas Price Hike by 50 Rupees)

१९ किलो वजनाच्या एलपीजी गॅसच्या किंमतीत ४९ रुपयांनी वाढ झाली आहे. आजपासून हे नवीन दर लागू झाले आहे. याआधीही जानेवारी महिन्यात एलपीजी गॅसच्या किंमती वाढल्या होत्या. तेव्हा तर १११ रुपयांची वाढ झाली होती. दरम्यान, व्यवसायिक गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. याचा कोणताही परिणाम घरगुती गॅसवर झालेला नाही. त्यामुळे घरगुती गॅसच्या किंमती स्थिर आहेत. यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला आहे.

आजचे एलपीजी गॅसचे दर (Today LPG Gas Price)

आज मुंबईत १९ किलो वजनाच्या एलपीजी गॅसच्या किंमती १६९२ रुपये झाल्या आहेत. याआधी या किंमती १६४२ होत्या. कोलकत्यात एलपीजी गॅसत्या किंमती १८४४.५० रुपये झाल्या आहेत. मागील दोन महिन्यापासून एलपीजी गॅसच्या किंमती वाढत असल्याने हॉटेलमालक किंवा खाद्य पदार्थांच्या व्यावसायिकांना चांगलाच फटका बसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट, ८ दिवसात खात्यात ₹२००० येणार?

Maharashtra Live News Update : व्हीएसआर कंपनीचे वी. के. सिंग यांची सीआयडीकडून चौकशी सुरू

Kolhapur : वाहन सर्व्हिसिंग मशीनने बैल धुणं पडलं महागात; कोल्हापुरात शॉक लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

How To Remove Facial Hair: चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी घरी कोणता उपाय करायचा?

Health Care : शेवग्याच्या पानांचे जबरदस्त फायदे,आताच आहारात समावेश करा

SCROLL FOR NEXT