LPG e-KYC Deadline Ends META AI
बिझनेस

LPG e-KYC Deadline : LPG e-KYC ची डेडलाइन संपली! आता सिलेंडर मिळणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती

LPG Update : LPG e-KYC ची १६ ऑगस्टची मुदत संपली आहे. डेडलाइन चुकल्यास कनेक्शन तात्काळ रद्द होत नाही, पण घरगुती सिलेंडरच्या दरात लाभ आणि पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.

Sakshi Sunil Jadhav

LPG e-KYC Deadline: घरगुती LPG ग्राहकांसाठी ई-केवायसी करण्याची मुदत १६ ऑगस्ट २०२६ संपली आहे. इंडेन, भारत गॅस आणि एचपी गॅस ग्राहकांना याबद्दल सातत्याने संदेश आणि अलर्ट करण्यात आलं होतं. पण डेडलाइन चुकली म्हणून तुमचे गॅस कनेक्शन कायमचं रद्द होईल, अशी परिस्थिती नाही. त्यासाठी तुम्ही पुढील नियम जाणून घेणं गरजेचं आहे.

e-kyc न केल्याने काय होईल?

तेल मंत्रालय आण गॅस कंपन्यांच्या सूचनेनुसार, ज्या ग्राहकांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही, त्यांची पडताळणी पूर्ण होईपर्यंत घरगुती दराने LPG सिलेंडर मिळायला अडचण येऊ शकते. काही प्रकरणांमध्ये कनेक्शन तात्पुरते निलंबित केले जाऊ शकते. पण ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर संबंधित सुविधा पुन्हा सूरू करता येऊ शकतात.

सिलेंडरच्या किमतीवर परिणाम

e-KYC रखडलेला असल्यास घरगुती दराचा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते. अशावेळी ग्राहकांना लागू असलेल्या इतर दरानुसार सिलेंडर घ्यावा लागू शकतो. त्यामुळे घरगुती LPG च्या तुलनेत खर्च मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

LPG e-KYC कशी पूर्ण कराल?

इंडेन ग्राहक IndianOil ONE अॅपच्या मदतीने घरबसल्या e-KYC प्रोसेस पूर्ण करू शकतात. तसेच अधिकृत LPG वितरक किंवा डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनही आधार प्रमाणीकरण करून प्रोसेस पूर्ण करता येते. भारत गॅस आणि एचपी गॅस ग्राहकांनीही आपल्या संबंधित कंपनीच्या अधिकृत माध्यमातून ई-केवायसीची स्थिती तपासावी.

ज्यांनी आधीच e-KYC पूर्ण केली आहे. त्यांना पुन्हा प्रोसेस करण्याची गरज नाही. पण e-KYC अजून केली नसेल तर ती शक्य तितक्या लवकर पूर्ण करणं महत्त्वाचं आहे. १६ ऑगस्टची मुदत संपली असली तरी कनेक्शन कायमटचं रद्द होत नाही. पण घरगुती एलपीजी मिळण्याच्या पात्रतेवर परिणाम होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

SIR मोहिमेचा आज शेवटचा दिवस, कोणत्या पक्षाने किती BLO नेमले; धक्कादायक आकडेवारी समोर

Harihar Fort : ट्रेकर्सच्या काळजाचा ठोका चुकवणारा हरिहर किल्ला, ११७ कातळ पायऱ्यांमागचं रहस्य जाणून घ्या

CJP कार्यकर्त्याच्या वडिलांचा मृत्यू, सरकारी शाळेची पोलखोल करणं जीवावर बेतलं; धक्कादायक घटनेने खळबळ

'मुन्नाभाई MBBS' फेम बॉलिवूड अभिनेत्याच्या कारचा गोव्यात भीषण अपघात; बाप-लेकाला उडवलं, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT