Sakshi Sunil Jadhav
चेहरा स्वच्छ असूनही मान आणि पाठीवर मळ किंवा टॅनिंग असेल तर संपूर्ण लूक फिका दिसू शकतो.
बेसन, दही किंवा दूध, थोडं मध आणि गुलाब पाणी वापरून तुम्ही सहज क्लींजर तयार करू शकता.
बेसन त्वचेवरचे तेल आणि जमा झालेली घाण साफ करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.
दह्यामुळे त्वचेला मॉइश्चर मिळतं. त्यामुळे क्लींजरनंतर त्वचा कोरडी होत नाही.
क्लींजरमध्ये थोडं मध मिसळल्याने त्वचेला मॉइश्चर मिळण्यास मदत होते आणि त्वचा मऊ वाटू शकते.
तुम्ही सर्व मिश्रण मानेला आणि पाठीला लावून १० ते १५ मिनिटं ठेवा आणि नंतर हलक्या हाताने मसाज करून पाण्याने धुवून टाका.
मान आणि पाठीची त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी हा घरगुती उपाय आठवड्यातून २ ते ३ वेळा वापरला जाऊ शकतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.