aadhaar card download Saam Tv
बिझनेस

Aadhaar Download: तुमचं आधार कार्ड हरवलंय आणि नंबरही आठवेना? टेन्शन सोडा! तरीही घरबसल्या मिळेल तुमचं कार्ड, जाणून संपूर्ण प्रक्रिया

EAadhaar Download: तुमचे आधार कार्ड हरवले असेल किंवा चोरी झाले असेल तर तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही घरबसल्या तुमचं आधार डाउनलोड करू शकता.

Sakshi Sunil Jadhav

आधार कार्ड हरवले किंवा क्रमांक विसरला तरी UIDAIच्या वेबसाइटवरून मोफत डाउनलोड करता येतो.

ईमेल किंवा मोबाईल नंबरद्वारे UID क्रमांक पुन्हा मिळवू शकता.

मोबाईल लिंक नसेल तर आधार केंद्रात जाऊन बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करावे लागते.

आधार कार्ड हे मूळ स्थानिक असल्याचे महत्वाचे ओळखपत्र आहे. त्यामुळे आपण ते आपल्या जवळ ठेवतो. तसेच प्रवासातही आपल्या पाकीटात हा पुरावा ठेवतो. याचा वापर सरकारी योजना, बँक अकाउंट उघडणं, मोबाईलचं सिम घेणं किंवा मुलांचं स्कूल अॅडमिशन या सगळ्यासाठी केला जातो. हा आधार क्रमांक खूप महत्वाचा असतो. पण अनेकदा लोक आपलं आधार कार्ड हरवतात किंवा नंबर लक्षात राहत नाही. जर तुमचंही असंच काहीसं झालं असेल तर काळजी करण्याची अजिबात गरज नाही. कारण आता आधार नंबर आठवत नसला तरी तुम्ही घरबसल्या तुमचं ई-आधार कार्ड सहज डाउनलोड करू शकता.

ई-आधार कार्डसाठी सर्वप्रथम UIDAIच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर 'My Aadhaar' या विभागात 'Retrieve Lost or Forgotten UID/EID' या पर्यायावर क्लिक करा. पुढे तुमचं नाव, जन्मतारीख आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी आणि कॅप्चा कोड भरावा लागेल. तुम्हाला एक ओटीपी येईल. तो व्हेरिफाय केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर तुमच्या आधारची संपूर्ण माहिती दिसेल. तसेच तुम्हाला ईमेल किंवा एसएमएसद्वारे UID किंवा EID क्रमांक मिळेल. ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे.

जर तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक नसेल, तर तुम्हाला जवळच्या आधार एनरोलमेंट सेंटरला भेट द्यावी लागेल. तिथे आधार नोंदणीच्या वेळी मिळालेल्या 28 अंकी एनरोलमेंट आयडी नंबरची आवश्यकता भासेल. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला ई-आधार डाउनलोड करण्याची परवानगी मिळते. या प्रक्रियेसाठी साधारणतः ३० रुपये शुल्क आकारले जाते.

याशिवाय UIDAI आता PVC आधार कार्डची सुविधाही देत आहे. हे कार्ड एटीएम कार्डसारखं दिसतं आणि वॉलेटमध्ये सहज ठेवता येतं. यासाठी UIDAIच्या वेबसाइटवर जाऊन तुमचा आधार क्रमांक भरावा लागतो आणि ओटीपी व्हेरिफाय करून Order Aadhaar PVC Card या पर्यायावर क्लिक करायचं असतं. ५० रुपये ऑनलाइन भरल्यानंतर यूआयडीएआय तुमचं कार्ड प्रिंट करून पाच दिवसांत पोस्टद्वारे पाठवतो. काही दिवसांतच तुमचं आधार कार्ड घरपोच मिळतं. म्हणूनच, आधार कार्ड हरवलं किंवा नंबर विसरलात तरी काळजी करू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Crime:धक्कादायक! विद्यार्थिनीवर मास्तराची वाईट नजर; अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Maharashtra Live News Update: ठाण्यातील पार्कमधील इमारतीच्या जाळीला अचानक आग

कल्याणकरांसाठी मोठी बातमी! आरोग्य विभागाने माता आणि नवजात बालकांसाठी घेतला गेमचेंजर निर्णय

Rupali Thombare: अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा, नेमकं काय प्रकरण?

White Collar Terror: व्हाईट कॉलर दहशतवाद, दिल्ली स्फोटाशी 5 डॉक्टराचं कनेक्शन ?

SCROLL FOR NEXT