LIC Scheme Saam Tv
बिझनेस

LIC Scheme: LIC ची जबरदस्त योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर मिळवा १ लाखांची पेन्शन

LIC New Jeevan Shanti Policy: एलआयसीच्या न्यू जीवन शांती पॉलिसीत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला सर्वाधिक परतावा मिळणार आहे. एकदा गुंतवणूक केल्यावर तुम्ही १ लाखांपर्यंतची पेन्शन मिळवू शकतात.

Siddhi Hande

प्रत्येकाला आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित जावे, असं वाटत असते. त्यामुळे प्रत्येकजण वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. जर तुम्हालाही कोणत्या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर एलआयसीची न्यू जीवन शांती प्लान हा उत्तम ऑप्शन आहे. हा एक रिटायरमेंट प्लान आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर लाखो रुपयांची पेन्शन मिळणार आहे.

एलआयसी न्यू जीवन शांती पॉलिसी एक सिंगल प्रिमियम प्लान आहे. यामध्ये एकदा गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही दरवर्षी १ लाख रुपये पेन्शन मिळवू शकतात. या योजनेतील गुंतवणूक तुम्हाला भविष्यात फायदेशीर ठरणार आहे.

एलआयसीच्या जीवन शांती योजनेत (LIC New Jeevan Shanti Policy) एकदा गुंतवणूक करुन आयुष्यभरासाठीच्या पेन्शनची गॅरंटी मिळते. या योजनेत ३० ते ७९ वयोगटातील लोक अर्ज करु शकतात. या योजनेत कोणताही रिस्क कव्हर होणार नाही. परंतु या योजनेत जबरदस्त परतावा मिळतो. त्यामुळे तुम्हाला भविष्यात कधीच आर्थिक अडचण भासणार नाही.

एलआयसी जीवन शांती पॉलिसी खरेदी करण्यासाठी दोन ऑप्शन दिले जातात. एक म्हणजे डेफर्ड अॅन्युटी फॉर सिंगल लाइफ आणि दुसरा म्हणजे डेफर्ड अॅन्युटी फॉर जॉइंट लाइफ. तुम्ही या योजनेत सिंगल किंवा जॉइन दोन्ही ऑप्शनमध्ये गुंतवणूक करु शकतात.

या योजनेत गुंतवणूक करताना तुम्ही तुमच्या पेन्शनची फिक्स्ड रक्कम ठरवू शकता. ही रक्कम तुम्हाला आयुष्यभर पेन्शन स्वरुपात मिळणार आहे. या योजनेत चांगले व्याज मिळते. या योजनेत जर ५५ वर्षीय व्यक्तीने ११ लाख रुपये गुंतवणूक केली त्यानंतर पाच वर्षासाठी होल्ड केली तर तुम्ही वर्षाला १,०१,८८० रुपये पेन्शन मिळवू शकतात. म्हणजेच तुम्हाला महिन्याला ८,१४९ रुपये पेन्शन मिळणार आहे. या योजनेत तुम्ही १.५ लाखांपासून गुंतवणूक करु शकतात. जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Biscuits Side Effects: तुम्हालाही बिस्कीट खायला आवडतं? पण होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; थरकाप उडवणारा Video Viral

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

BJP : भाजप नेत्याचा मुलाच्या कारमध्ये आढळले ड्रग्स, तरुणीसह पळून जाताना पोलिसाच्या अंगावर चढवली कार

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

SCROLL FOR NEXT